आणि आता ‘4G’वर चालणारा लॅपटॉप

नवी दिल्ली :
सध्याच्या ‘वर्क फॉर्म होम’ कायसंस्कृतीला चालना देण्यासाठी आणि भारतातील इंटरनेट जोडणीचा सर्वांगीण विचार करत एचपीने खास HP14s नोटबुक्स सादर केले. या नव्या नोटबुक उत्पादनांमध्ये 4G LTE कनेक्टिव्हिटी आहे. ही सुविधा याआधी फक्त एचपी एलिट ड्रॅगनफ्लाय आणि एचपी स्पेक्टर X360 अशा एचपीच्या प्रीमिअम नोटबुक्समध्ये उपलब्ध होती.
सध्या जगभरात कोरोनाचे संकट असताना लाखो वापरकर्त्यांना घरून काम करावे लागत आहे. मात्र, फिक्स्ड-लाइनवरून मिळणारे कमकुवत ब्रॉडबँड आणि घरगुती वाय-फायसाठी दुय्यम दर्जाची सुरक्षितता या त्यातील समस्या आहेत. अशा परिस्थितीत वेगवान आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवण्यात 4G LTE महत्त्वाची भूमिका बजावते. परवडणाऱ्या दरात व्यावसायिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षितता पुरवून नव्या एचपी नोटबुक्सने बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण दरी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. 

नफा गमावला; पण व्यापार वाढला  

१.५३ किलोग्रॅम वजन असलेल्या शैलीदार आणि वजनाने हलक्या एचपी 14s मध्ये तब्बल नऊ तासांपर्यंत चालणारी बॅटरी आहे. शिवाय सतत काम करणाऱ्या ग्राहकांची सोय म्हणजे ही बॅटरी वेगाने चार्ज होते. इंटेलच्या १०व्या जनरेशनमधील i3/i5 प्रोसेसरने सज्ज एचपी 14s मध्ये ७८ टक्के इतके स्क्रीन-टू-बॉडी प्रमाण आहे. 
याप्रसंगी एचपी इंडिया मार्केटचे व्यवस्थापकीय संचालक विनय अवस्थी म्हणाले, “सर्व वर्गातील ग्राहकांना प्रीमिअम वैशिष्ट्ये उपलब्ध करून देत तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण व्हावे, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. मुख्य प्रवाहातील उपकरणांमध्ये 4G LTE उपलब्ध करून दिल्याने भारतातील लाखो पीसी वापरकर्त्यांना कधीही कुठेही काम करण्याचा, शिकण्याचा, खेळण्याचा नवा अनुभव घेता येईल.”
या संदर्भात एचपी इंडिया मार्केटच्या पर्सनल सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले, “दूरस्थ पद्धतीने काम करणे ही बाब आता रूढ होत आहे. अशावेळी एचपी 14s रेंज कर्मचारी आणि मालकांना या परिस्थितीशी लढण्यास सज्ज करत आहे. परवडणाऱ्या दरात पर्सनल इंटरनेट देणारा भारतातील पहिला* पीसी म्हणून आधुनिक वापरकर्त्यांसाठी सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी या महत्त्वाच्या समस्या सोडवणे, हे आमचे लक्ष्य आहे.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here