नेक्स्ट जेन गेमर्ससाठी भन्नाट लॅपटॉप

नवी दिल्ली:
घरातून काम करणे हे आता ‘न्यू नॉर्मल’ बनत असताना लोक अधिकाधिक वेळ घरातच घालवत आहेत, मनोरंजन आणि एकूण हितकारक बाबींचे नवनवीन पर्याय धुंडाळत आहेत. अशात गेमिंगचे फायदेही नव्याने समोर येत आहेत. ​त्यामुळे​ ​ एचपीने भारतात ओमेन १५ आणि पॅवेलियअन गेमिंग या दोन नव्या गेम्सची भर त्यांच्या गेमिंग उत्पादन  टाकली आहे. ओमेन वेक्टर माऊस आणि एचपी वायरलेस गेमिंग हेडसेटही सादर करण्यात आले असून गेमेर्सना त्यांचा उत्कृष्ट खेळ खेळता यावा, या दृष्टीने या उत्पादनांची रचना करण्यात आली आहे.
नव्या ओमेन १५ मध्ये नव्याने डिझाइन केलेली या क्षेत्रातील सगळ्यात कमी आकाराच्या, १५ इंचांच्या गेमिंग लॅपटॉप असलेली चॅसिस आहे. त्यामुळे यातून मिनिमलिस्ट अभिजात सौंदर्य प्रतीत होते. तसेच, यात निळ्या रंगातून हिरव्या रंगाकडे जाणारा नवा ओमेन डायमंड लोगो आहे. हा लॅपटॉप मिका सिल्व्हर आणि शॅडो ब्लॅक अशा दोन रंगांत पर्यायी संपूर्ण आरजीबी पर-की लायटिंगसोबत उपलब्ध आहे. यातील अतिरिक्त वैशिष्ट्यांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे :
एचपी पॅवेलियन गेमिंग पोर्टफोलिओची रचना काम आणि खेळा या दोहोंसोबतच गेमिंग, व्हिडीओ एडिटिंग किंवा कंटेंट तयार करताना अधिक ताकदीसाठी करण्यात आली आहे. नवा एचपी पॅवेलियन गेमिंग १६ लॅपटॉप हा कंपनीचा पहिला १६ इंची डायग्नल गेमिंग पीसी आहे. यात देखण्या काळ्या रंगाच्या चौकटीत १०व्या जनरेशनचा Intel® Core™ i7 प्रोसेसर आणि NVIDIA® GeForce® GTX 1660Ti ग्राफिक्स आहेत.
दीर्घकाळ चालणाऱ्या गेमिंग सेशन्समध्ये आरामदायी वापरासाठी ओमेन वेक्टर माऊसची रचना अर्गोनॉमिकली अत्यंत हलक्या वजनाची, टेक्श्चर असलेल्या रबराची योग्य पकड आणि ओमेन कमांड सेंटर इंटीग्रेशन अशी करण्यात आली आहे. ईस्पोर्ट्स ग्रेड ओमेन रडार ३ सेन्सरसह यात ९९ टक्के अचूकतेसह १६००० डीपीआयपर्यंत, ४०० आयपीएसपर्यंत तसेच वेग आणि सेल्फ-कॅलिबरेशनला सपोर्ट केला जातो. ५० दशलक्षांपर्यंत क्लिक करता येतील, अशा दमदार ओमरॉन स्विचसह स्नॅग-प्रूफ ब्रेडेड केबलमुळे हा माऊस म्हणजे गेम जिंकण्याचे साधनच!

देशी स्टार्टअप ‘ट्रेल’ला वाढता प्रतिसाद

एचपी गेमिंगमधील अॅक्सेसरीजमध्ये नव्या एचपी  X1000 वायरलेस गेमिंग हेडसेटसह २० तासांचा वायरलेस असा स्वतंत्र गेमिंगचा अधिक समृद्ध अनुभव मिळतो. जाड इअर पॅड्स आणि सस्पेंशन हेडबँडमुळे ७.१ व्हर्च्युअल सराऊंड साऊंडचा आनंद घेण्याची उत्कृष्ट सोय होते आणि त्यास मोठ्या ५० मिमी. ड्रायव्हरची जोड देण्यात आली आहे. ओमेन कमांड सेंटरच्या माध्यमातून सहज अॅक्सेस असलेले ऑन-इअर बटन्स आणि इक्यू सेटिंग्स नियंत्रित करता येतात आणि त्यामुळे आवाजावर पूर्ण नियंत्रण राहते.
या प्रसंगी एचपी इंडिया मार्केटच्या पर्सनल सिस्टमचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले, “आपल्या व्यापक गेमिंग उत्पादन दालनाच्या माध्यमातून अधिक समृद्ध अनुभव देत एचपी सातत्याने गेमिंगच्या विकासाला हातभार लावत आहे. गेमिंगमध्ये सगळ्यांना एकच बाब लागू होत नाही, हे आम्ही जाणतो आणि म्हणून आमच्या पुरस्कारप्राप्त ओमेन सीरिजसह पॅव्हेलियन गेमिंग १६ खऱ्या अर्थाने विविध प्रकारच्या ग्राहकांना त्यांच्या गरजांनुरुप उपयुक्त ठरतो.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here