कोरोना काळातही चिकन खरेदीत होतेय वाढ

chiken

मुंबई : 
कोविड-१९ लॉकडाऊनदरम्‍यान चिकनची विक्री वाढत असताना सुगुना फूड्स या भारतातील आघाडीच्‍या लाइव्‍ह बर्ड प्रोड्युसर कंपनीचा ग्राहकांना मांस खरेदी करतेवेळी १.७ किग्रॅ ते २ किग्रॅ दरम्‍यान वजन असलेल्‍या जिवंत कोंबड्यांची निवड करण्‍याचा सल्‍ला दिला. कंपनीने सांगितले की, या वजनादरम्‍यानचे चिकन्‍स पोषक व आरोग्‍यदायी घटकांनी संपन्‍न असतात. चिकन हे प्रथिने, कॅल्शियम, अमिनो आम्‍ल, जीवनसत्त्व बी३, जीवनसत्त्व बी६, मॅग्‍नेशियम आणि इतर महत्त्वपूर्ण पौष्टिक घटकांचा संपन्‍न स्रोत आहेत. हे मांस लाल मांसच्‍या तुलनेत आरोग्‍यदायी असते. ब्रॉयलर मांसासाठी स्‍थानिक मागणी वाढतच आहे आणि अधिकाधिक लोक आरोग्‍यदायी संतुलित आहाराला प्राधान्‍य देत आहेत.

१.७ ते २ किग्रॅ वजन असलेल्‍या जिवंत कोंबड्यांचे मांस सेवनासाठी योग्‍य असते. या वजनामधील मांसामध्‍ये उत्तम पौष्टिक घटक असून ते स्‍वादिष्‍ट व लज्‍जतदार असते.सुगुना फूड्सच्‍या एलबी विक्रीचे महाव्‍यवस्‍थापक रविंद्रन बाबू म्‍हणाले, ”सुगुना फूड्समध्‍ये आमचा चिकनच्‍या दर्जावर सर्वाधिक भर आहे. आम्‍ही प्रत्‍येक पातळीवर उत्तम स्‍वच्‍छता राखण्‍यासह सुव्‍यवस्‍थापित वातावरणामध्‍ये कुक्‍कुटपालन करतो. कोंबड्यांना आरोग्‍यदायी ठेवण्‍यासाठी योग्‍य कालांतराने त्‍यांना आवश्‍यक संतुलित पौष्टिक खाद्य दिले जाते. आमचा ट्रेडमार्क ‘यंगर, टेंडर अॅण्‍ड बेटर’शी बांधील राहत आमचा त्‍याच मंत्रावर विश्‍वास आहे. आम्‍ही जिवंत कोंबड्यांचे वजन १.७ ते २ किग्रॅ दरम्‍यान असण्‍याची खात्री घेतो, ज्‍यामुळे अंतिम उत्‍पादन ग्राहकांसाठी स्‍वादिष्‍ट व चवदार मिळण्‍याची खात्री मिळते.” 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here