ओकिनावाकडून डिलर मार्जिन्समध्ये वाढ

okinawa

मुंबई :
ओकिनावा (okinawa) या मेक इन इंडियावर भर असलेल्या भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनीने डिलर मार्जिन्समध्ये प्रतिविक्री ११ टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. कोविड-१९ प्रादुर्भावा दरम्यान अनेक कंपन्या व लोकांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. ओकिनावाने (okinawa) डिलर मार्जिनमध्ये प्रतिविक्री ८ टक्क्यांवरून ११ टक्क्यांपर्यंत वाढ केल्याची घोषणा केली आहे. प्रत्येककजण एकत्र येऊन या कठीण काळाचा सामना करत असताना ब्रँडचा त्यांच्या डिलर नेटवर्कने अधिक लाभ प्राप्त करावा, असा उद्देश आहे. ही वाढ २७ एप्रिलपासून पुढील सूचना मिळेपर्यंत लागू आहे. ओकिनावाचे सध्या देशभरात ३५० हून अधिक डिलरशिप्सचे विक्री नेटवर्क आहे.
okinawa  
फोर्डला 2 अब्ज डॉलरचे नुकसान

डिलर मार्जिन्समधील वाढ डिलरच्या उत्पन्नामध्ये प्रतिवाहन २००० रूपयांची भर करण्याची अपेक्षा आहे. एकूण यामुळे डिलर्ससाठी मोठ्या प्रमाणात लाभ होईल. उदाहरणार्थ, डिलरने एका महिन्याला १०० वाहनांची विक्री केली, तर त्याला २,००,००० रूपयांहून अधिक अतिरिक्त लाभ होईल.
ओकिनावाचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक जीतेंदर शर्मा म्हणाले, ‘आमचे डिलर भागीदार खरे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत आणि ओकिनावाने नेहमीच त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच ओकिनावाने आज डिलर्स मार्जिन्समध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. आम्ही आशा करतो की, यामुळे अनेक उद्योगक्षेत्रांमध्ये मंदीचे वातावरण असताना डिलर्सना काहीसा आधार मिळेल.’

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here