‘इन्शुरन्सदेखो’ नेमणार १ लाख एजंट्स

मुंबई :
इन्शुरन्सदेखो या इन्शुअरटेक स्टार्टअपने चालू आर्थिक वर्षांत १,२०० कोटी मूल्याच्या नवीन प्रीमियमचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. सध्या कंपनीकडे ३५०हून अधिक शहरांत १२,०००हून अधिक पार्टनर्स आहेत. चालू आर्थिक वर्षासाठी कंपनीने आक्रमक विस्तार योजना आखल्या आहेत. यामध्ये देशभरात १ लाख एजंट्सच्या नियुक्तीचा समावेश आहे.

सध्याच्या वातावरणात, डिजिटल प्लॅटफॉर्म्सकडे वळण्याचे प्रमाण वेगाने वाढेल असा इन्शुरन्सदेखोचा अंदाज आहे. आपल्या एआय-एनेबल्ड प्लॅटफॉर्ममुळे या बदलाचा लाभ घेण्याची उत्तम क्षमता इन्शुरन्सदेखो कंपनीत आहे.
‘या’ कंपनीने केला 4000 कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना विमा’

इन्शुरन्सदेखोचे मुख्यकार्यकारी अधिकारी व सह-संस्थापक अंकित अगरवाल म्हणाले, “इन्शुरन्सदेखो देशात, विशेषत: आजपर्यंत फारशी सेवा न प्राप्त झालेल्या श्रेणी २ व श्रेणी ३ शहरांमध्ये, विम्याबद्दलची जागरूकता वाढवण्यासाठी व विमा संरक्षणाची व्याप्ती वाढवण्यासाठी बांधील आहे. देशभरात एक लाख एजंट्सची नियुक्ती करून प्रत्येक राज्यातील संभाव्य ग्राहकांपर्यंत शाश्वत पद्धतीने पोहोचण्याचे ध्येय आम्ही ठेवले आहे.”
एजंट्स हा विमा वितरण जाळ्यातील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे असे इन्शुरन्सदेखो समजते. आपल्या ऑनलाइन व्यवसाय प्रारूपाला पाठबळ देण्यासाठी तसेच लोकांना आपल्या उद्योजकतेच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यावर कंपनीने लक्ष केंद्रित केले आहे. छोट्या शहरांमध्ये प्रचंड संधी आहेत, यावरही इन्शुरन्सदेखोचा विश्वास आहे आणि ‘खऱ्या भारता’पर्यंत आपल्या सेवांचा विस्तार करण्यासाठी कंपनी समर्पितपणे काम करत आहे. 

गुंतवणूक आणि उद्योगजगताच्या अधिक महितासाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here