देशात चौथे लॉकडाऊन सुरु…

lockdown

नवी दिल्ली :
आज अपेक्षेप्रमाणे देशात चौथ्या लॉकडाऊनची घोषणा करत ३१ मे पर्यत हे लॉकडाऊन असेल असे सांगण्यात आले आहे. केंद्र सकारच्या राष्ट्रीय आपत्ती व व्यवस्थापन विभागाने यासंदर्भातील घोषणा पत्राद्वारे केली आहे. देशातील सर्वच राज्य सरकार आणि केंद्र सरकारने ३१ मे पर्यंत देशात लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यांसदर्भातील शिथितलेबाबत मार्गदर्शन सूचना आणि नियमावली जाहीर करण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे. 
भारतीय सैन्यदलाला करणार ‘आत्मनिर्भर’
naredra modi corona
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनपूर्वी देशातील नागरिकांशी संवाद साधला. त्यावेळी, देशावासीयांसाठी २० लाख कोटी रुपयांचे पॅकेजी घोषणा मोदींनी केली. देशाच्या जीडीपीच्या १० टक्के एवढ्या रकमचे जगातील सर्वात मोठं आर्थिक पॅकेज असल्याचंही मोदींनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. याच भाषणात, मोदींनी देशवासीयांना ४ थ्या टप्प्यातील लॉकडाऊनचे संकेत दिले होते. विशेष म्हणजे या लॉकडाऊनसाठी राज्य सरकारला विशेष अधिकार दिल्याचं मोदींनी सांगतिले होते. 
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here