आता असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही विमा संरक्षण

worker

मुंबई :
एडेलवेस गॅलाघरच्यावतीने असंघटित क्षेत्रातील आणि आघाडीच्या कामगारांसाठी महामारी गट विमा सुरक्षा सुरु केली आहे. हा उपक्रम नुकताच एका सर्वसमावेशक COVID-19 नुकसानभरपाई सुरक्षा कवचासह सुरु करण्यात आला होता आणि त्याला भारताच्या अव्वल विमा कंपन्यांनी समर्थन दिले आहे.
हा गटस्तरीय विमा उपाय खाद्य वितरण एजंट्स, कंपन्यांनी कारखान्यांमध्ये नियुक्त केलेले असंघटित  क्षेत्रातील कामगार तसेच रुग्णालयातील आघाडीचे कामगार, आरोग्य सेवा प्रदाता आणि औषध उत्पादक, जे आता स्वत:ला विशेष असुरक्षित मानतात, यांना विमा संरक्षण देईल.
एडेलवेस गॅलाघर यांनी चार आघाडीच्या सर्वसाधारण विमा कंपन्यांशी सहकार्य केले आहे आणि कामगारांना त्यांच्या खेड्यातून परत येण्यास आणि पुन्हा कामावर रुजू होण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे कामकाज पुन्हा सुरू करण्यासाठी 50 हून अधिक कॉर्पोरेट्सना मदत केली आहे. एकंदरीत, एडेलवेस गॅलाघर इन्शुरन्स ब्रोकर (ईजीआयबी) ने संपूर्ण भारतभरात 1.5 लाख लघु व मध्यम आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांमध्ये या उत्पादनाबद्दल जागरूकतेचा प्रसार केला आहे.

workers
‘या’ कंपनीने केला 4000 कर्मचाऱ्यांचा ‘कोरोना विमा’
विम्याचा हप्ता भरण्यासाठी केंद्राची सवलत

एडलवेस-गॅलाघर इन्शुरन्स ब्रोकर्स येथील मुख्य कार्यकारी अधिकारी विनय सोहानी यांनी स्पष्ट केले: “या अनिश्चित कालखंडाच्या दरम्यान, व्यवसाय मालक आपल्या लोकांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे कल्याण साधण्याकरता सक्षम आहेत हे सुनिश्चित करण्यात विमा कंपन्यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कॉर्पोरेट्स आणि विमा कंपन्यांसोबतच्या या सहकार्याने एक महत्वपूर्ण पोकळी भरून काढण्यास मदत होईल आणि रोख रकमेची समस्या, कमी मागणी आणि कामकाजात व्यत्ययाचा सामना करणाऱ्या कंपन्यांना फायदा होईल. ऑनलाइन आणि कागद विहीन दावे प्रक्रिया अखंड सुरु आहे आणि तिला समर्पित स्वास्थ्य दावे व्यवस्थापन चमूद्वारे मदत केली जाते.”
या विमा पॉलिसी खासगी तसेच सरकारी रूग्णालयात, रुग्णालयातील भरती कालावधीच्या संरक्षण कवचा करता कॉर्पोरेट्सना 50,000 ते 50 लाखांपर्यंत व्याप्ती प्रदान केल्या जाऊ शकतात. या संरक्षण कवचामध्ये अति दक्षता विभागातील उपचार, रस्ते रुग्णवाहिका आणि द्वितीय वैद्यकीय अभिप्रायाचा समावेश असेल. हे उत्पादन केवळ भारतीय बाजारपेठेसाठीच आहे आणि याकरता भारतातील आयसीएमआर अधिकृत चाचणी केंद्रात आयोजित कोरोनाव्हायरस रोगाच्या (कोविड -19) सकारात्मक चाचणी अहवालाची आवश्यकता आहे.

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here