विम्याचा हप्ता भरण्यासाठी केंद्राची सवलत

insurance, nirmala sitharaman

नवी दिल्ली :
कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ करण्यात आल्यानंतर आता थर्ड पार्टी मोटार विमा आणि आरोग्य विम्याच्या प्रिमियम भरण्याच्या मुदतीत १५ मे पर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली. 
२५ मार्च ते ३ मे या कालावधीमध्ये ज्या ग्राहकांचे मोटार आणि आरोग्य विम्याचे प्रिमियम भरणे देय होते आता त्यांना वाढीव मुदत मिळणार आहे. १५ मेपर्यंत त्यांनी या दोन्ही विम्याचा हफ्ता भरला तर त्यांच्या पॉलिसी कायम राहू शकतात. त्या रद्द होणार नाहीत. आधी ज्या विम्याचे प्रिमियम २५ मार्च ते १४ एप्रिल या काळात देय होते. त्यामध्ये २१ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली होती. सरकारच्या या निर्णयामुळे हे प्रिमियम सध्या तरी भरण्याची गडबड नाही. त्याचबरोबर प्रिमियम न भरल्यामुळे विमा पॉलिसी रद्द होणार नाही.लॉकडाऊनचा विचार करून सामान्य ग्राहकांचे हित जपण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. या ग्राहकांना १५ मेच्या आत आपला विमा नूतनीकरण करावे लागेल. सरकारने देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय आधीच घेतला आहे.
insurance

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here