IPSC कडून अत्यावश्यक सेवेसाठी ९०० प्लम्बर्स

IPSC

नवी दिल्‍ली :
कोविड-१९ संकटादरम्‍यान प्‍लम्बिंग सारख्‍या आवश्‍यक सेवांचे महत्त्व जाणून घेत इंडियन प्‍लम्बिंग स्किल्‍स कौन्सिलने (IPSC) कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) अंतर्गत असलेल्‍या कुशल भारत उपक्रमाशी संलग्‍न होत ९०० हून अधिक प्‍लम्‍बर्सचा डेटाबेस तयार केला आहे. हे प्‍लम्‍बर्स देशभरात लॉकडाऊन कालावधीदरम्‍यान त्‍यांची सेवा देण्‍यासाठी सज्‍ज आहेत. आयपीएससीने (IPSC) त्‍यांच्‍या संलग्‍न प्रशिक्षण भागीदारांना गरजूंना अन्‍न व आवश्‍यक वस्‍तूंचा पुरवठा करण्‍याची आणि तयारी व वितरण कृतींमध्‍ये आवश्‍यक साह्य देण्‍याची विनंती केली आहे. ७० हून अधिक प्रशिक्षण केंद्रांची अन्‍न वितरण/ आयसोलेशन केंद्रांमध्‍ये रूपांतरित करण्‍यासाठी निवड करण्‍यात आली आहे.

आरोग्‍य व सुरक्षि‍तताविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्‍याची गरज लक्षात घेत आयपीएससीने (IPSC) कोविड-१९ महामारीदरम्‍यान या नियमांचे पालन होण्‍याकरिता प्‍लम्बिंग कर्मचा-यांसाठी मार्गदर्शकतत्त्वे देखील तयार केली आहेत. इंडियन प्‍लम्बिंग क्षेत्रातील प्रख्‍यात प्रमुख व तज्ञांकडून नेतृत्वित खास आयपीएससी (IPSC) टेक्निकल टास्‍क फोर्सने ही मार्गदर्शकतत्त्वे तयार केली आहेत. या मार्गदर्शकतत्त्वांमध्‍ये काय करावे व काय करू नये या महत्त्वपूर्ण माहितीसह निवासी इमारती व सदनिका, रूग्‍णालये, आयसोलेशन केंद्रे, व्‍यावसायिक संकुले व इतर संस्‍थाने अशा ठिकाणांनुसार घ्‍यावयाच्‍या खबरदारीच्‍या उपायांचा समावेश आहे.
IPSC, corona
कोरोना योध्यांना एमजी मोटर तर्फे ‘१०० हेक्टर’

अॅडव्‍हायझरीमधील महत्त्वपूर्ण वैशिष्‍ट्ये:
१.    सोशल डिस्‍टन्सिंगचे पालन करा.
२.    साधने, उपकरणे, टच पॉइण्‍ट्स – वापरण्‍यात येणा-या सोल्‍यूशन्‍सच्‍या प्रमाणाचे निर्जंतुकीकरण करा.
३.    कॅशलेस व्‍यवहारांना प्राधान्‍य द्या.
४.    वापरलेल्‍या साहित्‍याची विल्‍हेवाट लावा.
५.    संकटामध्‍ये स्‍वयं-मदतीसाठी ग्राहकांना जागरूक करा.
६.    आवश्‍यक असल्‍यास बॅकट्रॅकिंगसाठी लॉग राखणे.

गृह मंत्रालयाने १५ एप्रिल २०२० ला जारी केलेल्‍या आदेशानुसार प्‍लम्‍बर्ससह स्‍वयं-रोजगार कर्मचा-यांना २० एप्रिल २०२० पासून त्‍यांची सेवा देण्‍यास परवानगी देण्‍यात येईल. पण कामाच्‍या स्‍वरूपामुळे विशेषत: आरोग्‍य व सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शकतत्त्वांमध्‍ये पालन केल्‍या जाणा-या प्रक्रियांमध्‍ये महत्त्वपूर्ण बदल करण्‍यात आले आहेत.

कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांडे म्‍हणाले, ”आयपीएससीचे ही मार्गदर्शकतत्त्वे तयार करण्‍यामधील सक्रिय प्रयत्‍न प्रशंसनीय आहेत आणि भारताच्‍या कोरोनाव्‍हायरस महामारीविरोधातील लढ्याला साह्य म्‍हणून स्‍वागतार्ह पाऊल आहे. आयपीएससीकडे देशाला त्‍यांची सेवा देण्‍याच्‍या माध्‍यमातून योगदान देण्‍यासाठी स्‍वयंसेवकांकडून सातत्‍याने विनंती केली जात आहे. म्‍हणून ९०० प्‍लम्‍बर्सचा हा आकडा सातत्‍याने वाढत जाईल.”

इंडियन प्‍लम्बिंग स्किल्‍स कौन्सिलचे अध्‍यक्ष डॉ. राजेंद्र के. सोमानी म्‍हणाले, ”भारतीय नागरिकांचे आरोग्‍य व सुरक्षितता अत्‍यंत महत्त्वाची आहे. प्‍लम्बिंग कर्मचारी देशाचे आरोग्‍य राखण्‍यामध्‍ये अत्‍यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. एमके गुप्‍ता व विनय गुप्‍ता (उपाध्‍यक्ष, आयपीएससी) यांच्‍या नेतृत्‍वांतर्गत टेक्निकल टास्‍कफोर्सने ही मार्गदर्शकतत्त्वे तयार केली आहेत. कोविड-१९ महामारीचा अधिक प्रादुर्भाव टाळण्‍यासाठी कर्मचा-यांनी अतिरिक्‍त खबरदारी उपायांचे पालन केले पाहिजे.”
IPSC, corona
‘The boy who harnessed the wind’ : आशेची पवनचक्की

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here