इराणने बदलले देशाचे चलन

iran currency

तेहरान : 
अमेरिकेनं लादलेल्या निर्बंधामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इराणच्या (iran) चलनाची नेहमीच पडझड होत होती. त्यामुळे सातत्याने चलनातील होणारी घसरण थांबवण्यासाठी इराणनं थेट आपलं चलनच बदलत असल्याचे जाहीर केले. इराणनं (iran)रियाल हे चलन बदलून तोमान या चलनाला अधिकृत मान्यता दिली असून, एका तोमानची किंमत ही १० हजार रियाल इतकी असणार आहे. इराण संसदेत चलन बदलासंबंधीचं विधेयक मंजूर करण्यात आलं असून, राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. 
iran currency
‘गरिबांच्या हातात पोहोचू दे थेट पैसे’
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबरोबरचा करार रद्द केला होता. त्यानंतर इराणवर (iran)अनेक आर्थिक निर्बंधही लादले होते. याच कारणामुळे इराणच्या चलनाचे मूल्य ६० टक्क्यांपर्यंत घसरले होते. इराणी चलनाची किंमत घसरल्याने आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तो कमकुवत झाल्याने महागाई वाढली होती. पण आता बदललेल्या चलनामुळे सामान्यांना दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीसुद्धा मर्यादित राहतील, असाही दावा केला जात आहे.
इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने चलन बदलाचा प्रस्ताव सादर केला. केंद्रीय बँक असणाऱ्या सेंट्रल बँक ऑफ इराणला चलन बदलण्यासाठी दोन वर्षांची मुदत देण्यात आली आहे. चलनामधून चार शून्य हटवण्याची चर्चा इराणमध्ये २००८पासून सुरु होती. पण २०१८नंतर या निर्णयाच्या मागणीनं चांगलाच जोर धरला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१५मध्ये इराणबरोबरच्या अणुकरारामधून बाहेर पडण्याची घोषणा केल्यानंतर इराणच्या चलनाचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरू लागले.

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here