५० टक्के ईएमआयमध्ये घेऊन ‘जावा’

मुंबई :
जावा पैराक ही 2020 मधील सर्वांच्या पसंतीस उतरलेली मोटरसायकल ठरली असून आता ती रस्त्यांवर कधी धावणार तसेच रात्रीच्या अंधारात तिच्यावर बसून फेरफटका मारण्याचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. या मोटारसायकलवर सुरुवातीच्या इएमआयवर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. 20 जुलैपासून ‘जावा’ सर्वत्र मिळू शकणार आहे. 
पैराकला पहाताना मन काळाच्या ओघात मागे जात असले, तरीही ती काळाच्या पुढेच आहे. तिचे फॅक्टरी कस्टम रूप डिझाईन करून बांधणी करण्यात आली. तिचा रुबाब ‘स्लीथ, विजीलंट आणि डार्क’ आहे. यामधील BSVI स्टॅण्डरनुसार तयार करण्यात आलेली ही मशीन तिचा रुबाब आणखीनच खुलवणारे असून ‘बॉब’ स्टाईल फेंडर, हटके एक्झॉस्ट आणि फ्लोटिंग सीटचा अनुभव देणारी एक अस्सल ‘बॉबर’ बनवते. ही भारताची पहिली लिक्विड कुल्ड, सिंगल सिलेंडर, फोर स्ट्रोक, डीओएचसी इंजिनच्या शक्तीने युक्त फॅक्टरी कस्टम आहे, जी 30.64 पीएस पॉवरची निर्मिती करते आणि हिचे 32.74 एनएम टोर्क आपल्या ‘बॉबर’ दिमाखासह सिग्नेचर ट्वीन जावा एक्झॉस्टच्या साथीने उत्सर्जन शक्य होते.
टाळेबंदी दरम्यानचा कालावधी फलदायी ठरल्याचे पैराक प्रोडक्ट टीम मान्य करते. त्यांनी यापूर्वी 31 एनएम असलेला टोर्क जवळपास 2एनएम0ने वाढवला. उच्चतम टोर्क एकाच गतीत तसेच वेग वाढवताना चांगला पुलिंग परफॉर्मन्स देतो. याचा फायदा इंजिन अतिशय चांगल्याप्रकारे ट्युनिंग करण्यासाठी होतो. नवीन क्रॉस पोर्ट तंत्रज्ञान थरारक कामगिरीची खातरजमा करतो. तर BSVI रेग्युलेशनसह स्वच्छ उत्सर्जन शक्य होते. ही सर्व शक्ती डांबरी रस्त्यावर सुधारीत गुणोत्तरासह 6-स्पीड ट्रान्समिशन उपलब्ध करून देते. ज्यामुळे गिअरमार्फत अद्वितीय रायडींगचा अनुभव मिळतो.
‘क्विक हिल’ रोखणार सायबर हल्ले

जावा पैराकचे अनावरण करताना क्लासिक लेजेंड्सचे सह-संस्थापक, अनुपम थरेजा म्हणाले की, “आम्ही पैराक बांधणीचा निर्णय घेतला, त्यावेळी ध्येय सोपे होते. आम्हाला विशेष, व्यक्तिगत स्वरुपाची आणि कामगिरी करणारी मोटरसायकल तयार करायची होती. जी दिसायला दणकट आणि डार्क म्हणजेच लक्षवेधी असेल. भारताची पहिली फॅक्टरी कस्टम कल्पनेवर आधारीत पैराक अगदी तशीच असून स्वत:चा दिमाख मिरवायला सज्ज झाली आहे. आम्हाला आमच्या निर्मितीचा अभिमान वाटतो. आमच्या ग्राहकांनी तिच्या आगमनाची मजा घ्यावी. आमच्यातर्फे त्यांचे ‘डार्क’ बाजूत स्वागत आहे. आता पैराक स्वारांच्या रात्रीची व्याख्या पूर्णपणे बदलेल ही आशा करतो.
बाईकस्वारांना/बायकर्सना सहजपणे मोहात पाडण्यासाठी जावा पैराक सोपे आर्थिक पर्याय उपलब्ध करुन देते.  प्रत्येक जावा विक्रेत्यांकडील आर्थिक पर्यायांमध्ये काही ना काही वैशिष्ट्य असतेच. त्यातील काही महत्त्वाची वैशिष्ट्ये :
सुरुवातीच्या 3 ईएमआयवर 50% सवलत
विशेष ईएमआय योजना- केवळ रु. 6,666/दरमहा
अत्यंत कमी ईएमआय योजना- 2 वर्षांसाठी रु. 8,000/- आणि 3 वर्षांसाठी रु. 6,000/-
100% आर्थिक सहाय्य/शून्य डाऊनपेमेंट/उत्पन्नाचा पुरावा आवश्यक नाही (अटी आणि शर्ती लागू)
नोव्हेंबर 15, 2019 रोजी जावा पैराक बाजारात अधिकृतरित्या दाखल करण्यात आली आणि या फॅक्टरी-कस्टम बॉबर मोटरसायकलचे बुकिंग 1 जानेवारीपासून सुरू करण्यात आले. या मोटरसायकलची एक्स शोरुम दिल्ली येथील किंमत रु. 1,94,500/- आहे.  संपूर्ण भारतातील जावा वितरकांकडे ही मोटरसायकल डिस्प्ले, टेस्ट राईड आणि बुकिंगसाठी उपलब्ध आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here