मुंबई :
क्लासिक लेजेंड्स प्रा. लि.च्या वतीने देशभरातील विक्रेत्यांच्या नेटवर्कद्वारे जावा आणि जावा फॉर्टी-टू BS-VI मॉडेलच्या डिलिव्हरीला सुरुवात झाली आहे. आता दोन्ही मॉडेल डिस्प्ले, टेस्ट राईड आणि नोंदणीकरिता जावा विक्रेत्यांकडे उपलब्ध असतील.
जावा आणि जावा फॉर्टी-टू, अशा दोन्ही मॉडेलमध्ये 293सीसी, लिक्वीड-कुल्ड, सिंगल सिलेंडर, DOHC इंजिनचा समावेश आहे. दोन्ही बाईकमध्ये आता भारताचे पहिले क्रॉस पोर्ट तंत्रज्ञान समाविष्ट आहे, ज्याच्या साह्याने इंजिनची वॉल्युमेट्रीक इफिशीयन्सी वाढते. ज्यामुळे चार्ज आणि एक्झॉस्ट गॅसचा प्रवाह अधिक चांगला होतो तसेच शक्ती आणि टोर्क आऊटपूट सुधारते.
यामध्ये वापरण्यात आलेले इंजिन हे जगातील पहिले सिंगल सिलेंडर इंजिन आहे, ज्यामध्ये क्रॉस पोर्ट कॉन्फीगरेशनचा वापर करण्यात आला. एकसमान शक्ती आणि टोर्कला बीएस4 कॉन्फीगरेशनची सुविधा लाभल्याने ग्राहकांना सर्वोत्तम राईडिंगचा अनुभव मिळतो. हे तंत्रज्ञान मोटरसायकलमध्ये वैशिष्ट्यपूर्ण ट्वीन एक्झॉस्ट आयडेंटीटी राखायला मदत करते. समान शक्ती आणि टोर्क संख्या राखत या बाईकमध्ये BS-VI उत्सर्जनाची कठोर मानके वापरली जात आहेत.
सिंगल सिलेंडर इंजिनवरील जगातील पहिल्या क्रॉस पोर्ट कॉन्फीगरेशन देण्यात आलेल्या जावाची कामगिरी अधिक सातत्यपूर्ण राहावी, रस्त्यांची स्थिती कशीही असल्यास स्वच्छ उत्सर्जन मिळावे म्हणून आतील-बाहेरील चलनवलनाकरिता लॅम्ब्डा सेन्सर मॉनीटर देण्यात आले आहेत. यामधील इंधन व्यवस्थेत देखील सुधारणा करण्यात आली आहे. याच्या इनपूटमध्ये बारीक-सारीक अचूक बदल करण्यात आल्याने त्याचे थ्रोटल अधिक सहजतेने फिरते.सीटवर देखील पुन्हा काम करून नवीन सीट पॅन बसविण्यात आले. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आरामदायक कुशनिंगची सुविधा मिळते. दोन्ही जावा मॉडेलमध्ये सर्वोत्तम ब्रेकिंग सिस्टीम (सिंगल तसेच ड्यूएल चॅनल)चा समावेश आहे. तसेच कॉन्टीनेन्टलद्वारे स्पर्धात्मक उत्पादनांच्या तुलनेत एबीएस कमी ब्रेकिंग अंतर आणि सर्वोत्तम नियंत्रण प्रदान करते.