‘या’ कंपनीने आणले नैसर्गिक ‘मिनरल सनस्क्रीन’ 

मुंबई :
‘आरएसएच ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड’ आपल्या जॉय या ब्रँडने, नैसर्गिक, रसायन-मुक्त एसपीएफसह नवीन ‘जॉय मिनरल सनस्क्रीन’ बाजारात आणण्याची घोषणा केली. याशिवाय, मिथिला पारकर या  अभिनेत्रीची सनस्क्रीन या श्रेणीसाठी ‘ब्रँड अँम्बेसेडर’ म्हणून जॉयतर्फे नियुक्ती करण्यात आली आहे. ‘जॉय पर्सनल केअर’ हा भारतातील सर्वात मोठ्या सनस्क्रीन ब्रॅंडपैकी एक आहे. बाजारपेठेत या ब्रॅंडचा सुमारे 20 टक्के हिस्सा आहे. ‘सनस्क्रीन’च्या क्षेत्रात आपला हिस्सा वाढविण्याच्या दृष्टीने ‘जॉय’ने ‘मिनरल सनस्क्रीन’ बाजारात सादर केले आहे. या सनस्क्रीनमध्ये सूर्यप्रकाशातील अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण करण्यासाठीचे खास ‘सन प्रोटेक्शन फॅक्टर’ (एसपीएफ) असल्यामुळे, तसेच याची किंमत कमी असल्याने बाजारातील इतर उत्पादनांपेक्षा ते निराळे ठरते.
‘जॉय मिनरल सनस्क्रीन’ हे दररोज वापरण्याजोगे आहे, यावर या कंपनीने भर दिला आहे. या संदर्भातील जाहिरातीमध्ये मिथिला पारकर नमूद करते, की ती नैसर्गिक घटकांचा वापर करण्याबाबत खूपच चोखंदळ आहे. ती नेहमी नैसर्गिक साबण, ऑरगॅनिक चहा किंवा सेंद्रिय भाज्या यांचाच वापर करते. त्वचेची काळजी घेण्याचा मुद्दा उपस्थित होतो, तेव्हा तर ती नैसर्गिक घटक असलेल्या उत्पादनाचीच निवड करते आणि साहजिकच, नैसर्गिक, रसायन-मुक्त, ‘एसपीएफ’ने युक्त असे ‘जॉय मिनरल सनस्क्रीन’ हेच तिच्या दैनंदिन उपयोगाचे उत्पादन आहे.

आणि आता ‘4G’वर चालणारा लॅपटॉप

‘आरएसएच ग्लोबल’चे अध्यक्ष सुनील अग्रवाल म्हणाले, “सूर्यप्रकाशातील ‘यूव्हीए’ व ‘यूव्हीबी’ या दोन किरणांचे त्वचेवर काय दुष्परिणाम होतात, हे आजकाल सर्वच ग्राहकांना माहीत असते. व्यापक अर्थाने त्वचेचे संरक्षण करणारे सनस्क्रीन घेण्याकडे सर्वांचा कल असतो. त्यामुळेच हे नावीन्यपूर्ण सनस्क्रीन दररोज लावावे, यावर आमच्या जाहिरातींत भर देण्यात येत आहे. ‘मिनरल सनस्क्रीन’ किंवा ‘रसायनमुक्त’ सनस्क्रीन ही संकल्पना सामान्यजनांसाठी नवीन असली, तरी त्वचेशी संबंधित व्यावसायिकांसाठी ती महत्त्व राखून आहे. आमच्या ‘सनस्क्रीन’मध्ये ‘झिंक ऑक्साईड’ हा एक महत्त्वाचा अजैविक स्वरुपाचा घटक आहे. तो प्रकाशाचे परावर्तन या तंत्राने काम करतो. या ‘झिंक ऑक्साईड’चा पातळ थर त्वचेवर बसतो. या थरामुळे ‘यूव्हीए’ व ‘यूव्हीबी’ हे अतिनील किरण त्वचेमध्ये शोषले जात नाहीत व त्वचेचे प्रत्यक्ष संरक्षण घडून येते. ‘सनस्क्रीन’च्या श्रेणीमध्ये या नव्या उत्पादनाचा समावेश झाल्याने व बाजारातील अन्य उत्पादनांच्या तुलनेत या सनस्क्रीनचा उत्कृष्ट परिणाम ग्राहकांना सहज जाणवणार असल्याने आम्ही मोठ्या अपेक्षा बाळगून आहोत.’’  
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here