‘जॉय’ने आणले हर्बल सॅनिटायझर

मुंबई :
कोरोनाचा प्रसार सुरु झाल्यापासून विविध कंपन्यांनी सॅनिटायझर बाजारात आणायला सुरुवात केली. ‘आरएसएच ग्लोबल’ने देखील ‘जॉय’ या आपल्या प्रमुख ब्रँड अंतर्गत ‘हर्बल हँड सॅनिटायझर’ सादर केले आहे. ‘कोविड-19 ‘च्या विरोधातील लढ्यादरम्यान मागणी व पुरवठा यांच्यातील तफावत कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवून दरमहा लाखो बाटल्या ‘हँड सॅनिटायझर्स’ तयार करण्याचे कंपनीचे उद्दीष्ट आहे.
‘जॉय इन्स्टंट क्लीन हँड सॅनिटायझर’ या नव्या उत्पादनात, अल्कोहोलचे प्रमाण 70 टक्के असून वनौषधींचाही उपयोग त्यात करण्यात आला आहे. हे सॅनिटायझर 99.9 टक्के जंतूंचा नाश करते, संसर्ग प्रतिबंधित करते आणि हात पूर्णपणे स्वच्छ करते. यातील कोरफडीच्या अर्कामुळे हाताच्या त्वचेतील्र आर्द्रता टिकवून ठेवली जाते व ते कोरडे पडत नाहीत. या द्रव्यातील अल्कोहोल जंतूंचा नाश करून बाष्पीभवनाने नाहिसे होते आणि कोरफड त्वचेला मऊ आणि आर्द्र ठेवून संरक्षणात्मक थर तयार करते.

‘हे’ पीपीई आहेत भारतीय वातावरणाला पूरक 
joy

या ‘सॅनिटायझर’चे उत्पादन संपूर्ण भारतभरात करण्यात येणार आहे. जलद उपलब्धतेसाठी किराणा, औषधे व सौंदर्यप्रसाधनांची दुकाने, तसेच इ-कॉमर्स प्लॅटफॉर्म अशा पारंपरीक व आधुनिक मार्गांनी ते बाजारात उतरवले जाईल. सध्या, हे उत्पादन 55 रुपये किंमतीच्या 110 मिली बाटलीमध्ये विकले जाईल. 70 मिलीलीटरची ट्यूब,  50 मिलीची बाटली आणि 500 ​​मिलीची बाटली अशा पॅकिंगमध्ये ते जून 2020 पर्यंत आणले जाईल.
‘आरएसएच ग्लोबल’चे अध्यक्ष सुनील अगरवाल म्हणाले, ‘’कोरोना व्हायरस’च्या उद्रेकामुळे आपण सर्वांनीच आता स्वच्छता आणि सॅनिटायटेशनच्या पद्धतीमध्ये बदल केला आहे. या बाबी आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनल्या आहेत. ग्राहकांना त्यांची सवय लागणार आहे. साहजिकच प्रभावी अशा ‘सॅनिटायझर’ला देशात सध्या प्रचंड मागणी आहे. त्या तुलनेत पुरवठा खूपच कमी आहे. त्यामुळे देशातील एक जबाबदार कंपनी या नात्याने आम्ही वैयक्तिक स्वच्छता उत्पादनांच्या श्रेणीत काम करण्याचा निर्णय घेतला. ‘हँड सॅनिटायझर’ हे आमचे असे पहिले उत्पादन आहे.”
‘आरएसएच ग्लोबल’च्या मुख्य विपणन अधिकारी पौलोमी रॉय म्हणाल्या, ‘’कोविड-19चा सामना करण्यासाठी स्वच्छता उत्पादने अत्यंत आवश्यक आहेत. म्हणूनच आम्ही पुढच्या काही महिन्यांत हँड वॉश, फेस वॉश, स्किन क्रीम आणि हॅंड क्रीम यांसारख्या जंतूनाशक उत्पादनांची श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही सर्व उत्पादने जंतूंपासून संरक्षण करण्यात अत्यंत प्रभावी ठरतीलच, त्याचबरोबर त्यांतील कोरफड, लिंबू, पुदीना, पीच, तुळस, हळद, ट्री टी इत्यादी नैसर्गिक पदार्थ त्वचेची आर्द्रता टिकवून तिची काळजीही घेतील. पारंपारिक व आधुनिक व्यापार आणि ई-कॉमर्स वाहिन्यांमधील आमचे मजबूत वितरण नेटवर्क यांच्या सहाय्याने आम्ही ही अतिशय आवश्यक उत्पादने परवडणाऱ्या किंमतींमध्ये सर्वसामान्यांना सहजपणे उपलब्ध करून देऊ.”

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here