…आता मिळणार अवघ्या १ रुपयांत सॅनिटायझर्स

​मुंबई :​
कोरोनामुळे देशभरात सामाजिक दुरावा आणि वैयक्तिक स्वच्छतेचे वाढलेले महत्व आणि त्याचवेळेला बाजारात उपलब्ध असलेल्या महागड्या सॅनिटायझर्समुळे सर्वसामान्याकडे दुसरा उत्तम पर्याय दिसत नव्हता. हि अडचण लक्षात घेत केविनकेअर या आघाडीच्या कंपनीने सर्वसामान्यांना परवडेल आणि सहज कुठेही मिळू शकेल अशा अवघ्या एक आणि दोन रुपयांच्या  सॅनिटायझर्सची पाकिटे बाजारात उपलब्ध करून दिली आहेत.
लोकांना सेवा देण्‍याच्‍या उद्देशाने केविनकेअरने त्‍यांचे पर्सनल केअर ब्रॅण्‍ड्स – चिक, नाइल आणि प्रोफेशनल ब्रॅण्‍ड – रागा अंतर्गत हँड सॅनिटायझर सादर केले आहे. चिकने १ रूपयाच्‍या २ मिली सॅशेमध्‍ये देखील सॅनिटायझर सादर केले आहे, जे किमान दोनदा वापरता येऊ शकते. हा ब्रॅण्‍ड देशभरातील किराणा स्‍टोअर्समध्‍ये उपस्थित असल्‍यामुळे प्रत्‍येकासाठी सहजपणे व किफायतशीर दरामध्‍ये उपलब्‍ध होऊ शकतो. नाइल त्‍याच्‍या अद्वितीय सुत्रीकरणासह ५ लीटर पॅकमध्‍ये, तसेच लहान पॅकेट्समध्‍ये लोकांच्या गरजांची पूर्तता करेल आणि तज्ञांचा विश्‍वासार्ह असलेला रागा ब्रॅण्‍ड देशभरातील सलोन विभागाच्‍या गरजांची पूर्तता करेल.
यासंदर्भात केविनकेअर प्रा. लि.चे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक सीके रंगनाथन म्‍हणाले, ”सध्‍याच्‍या कठीण काळामध्‍ये अनेक लोकांना दर्जेदार हँड सॅनिटायझर्स उपलब्‍ध होऊ शकत नसल्‍यामुळे प्रत्‍येक व्‍यक्‍तीला दर्जेदार आणि आवश्‍यक उत्‍पादन सुलभपणे व वाजवी दरामध्‍ये उपलब्‍ध करून देणे ही आमची जबाबदारी आहे. सॅशेमध्‍ये सॅनिटायझर सादर करण्‍यासह विशिष्‍ट एफएमसीजी किराणा आऊटलेट्समध्‍ये ते उपलब्‍ध करून देण्‍याची संकल्‍पना या अवघड स्थितीमध्‍ये लोकांच्‍या सुरक्षिततेच्‍या खात्रीसाठी एक योग्‍य पाऊल आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here