‘खाताबुक’ने उभारले ४५४ कोटी

मुंबई :
सूक्ष्म, लघु आणि मध्यम स्वरुपातील व्यवसायांना व्यापारविषयक देवाण-घेवाण व्यवहार करणे तसेच त्यांचे ट्रॅकिंग करण्यात मदत करणाऱ्यात अग्रेसर असलेल्या युटिलिटी सोल्यूशन प्रोव्हायडर खाताबुकने सीरीज बी निधी मालिकेत ४५४ कोटी रुपयांचा निधी जमवण्यात यश मिळवले आहे. या फेरीचे नेतृत्व बी कॅपिटल ग्रुप आणि सिकोइया इंडिया आणि डीएसटी पार्टनर्स या सध्याच्या गुंतवणूकदारांनी संयुक्तरुपात केले आहे.
या निधीद्वारे खाताबुकला भारतीय व्यावसायकिांसाठीची उत्पादने आणि सेवा वाढवणे तसेच त्या अधिक मजबुत करण्याची संधी मिळेल. यासोबतच वित्तीय सेवांसाठी तंत्रज्ञान समाधान विकसित करणे तसेच मोठ्या व्यापार केंद्रित वितरण मंचामध्ये प्रवेश करण्याची कंपनीची तयारी सुरू आहे. आज पश्चिम भारतातील शहर आणि गावांतील १ कोटी नोंदणीकृत व्यापारी खाताबुकचा वापर करुन दैनंदिन व्यवहार करतात.

‘एमएसएमई’साठी आता ‘कॅनरा क्रेडिट सपोर्ट’
khatabook
खाताबुकचे सह-संस्थापक आणि सीईओ रवीश नरेश म्हणाले, ‘भारतात ८० लाखाहून अधिक अॅक्टिव्ह यूझर्ससह खाताबुक देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम आकारातील व्यापारांमध्ये सर्वात मोठी कंपनी आहे. खाताबुक एमएसएमईच्या डिजिटायझेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हे क्षेत्र म्हणजे,आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे अॅप व्यापाऱ्यांना उत्पन्न वाढवण्यात मदत करत आहे. तसेच अधिक सक्षम आणि खिलाडूवृत्तीचे बनवत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, गुजरातसहित पश्चिम भारतातील अनेक राज्यातील व्यापारी आपल्या व्यवसायाचे व्यवस्थापन करण्यासाठी खाताबुकचा वापर करत आहेत. आपण भारतात एमएसएमईंना बळकटी देण्यासाठी सरकार आणि इतर वित्तीय संस्थांसोबत काम करण्याच्या शक्यता पडताळून पाहत आहे.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here