‘किम जोंग उन जिवंत आणि प्रकृतीही उत्तम’

kim jong

उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन (kim jong un) हे जिवंत असून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती दक्षिण कोरियाकडून देण्यात आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वीही किम जोंग उनच्या (kim jong un) मृत्यूचं वृत्त उत्तर कोरियानं फेटाळलं होतं.
“किम जोंग उन यांची प्रकृत्ती उत्तम आहे आणि ते जिवंत आहेत. ते १३ एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत,” अशी माहिती दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी सीएनएनशी बोलताना दिली. तसंच उत्तर कोरियाचं संस्थापक आणि त्यांचे आजोबा किम इल-सुंग यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही किम जोंग उन (kim jong un) यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आलं होतं. १५ एप्रिलचा दिवस हा उत्तर कोरियाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. २०११ मध्ये आपल्या वडिलांच्या हातून सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत या दिवशी होणारा कार्यक्रम कधीही चुकवला नव्हता.
kim jong
किम जोंग उन यांची प्रकृती गंभीर!

काही दिवसांपूर्वी उन यांची प्रकती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे (cardiovascular) उपचार सुरू असल्याचं समोर आलं होतं. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता दक्षिण कोरियानं दिलेल्या माहितीनंतर त्यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here