मुंबई :
देशभरात लागू केलेल्या कोरोना-लॉकडाऊनमुळे लोकांना घराबाहेर पडत येणे कठीण झाल्यामुळे त्यांना बँकेचे व्यवहार करताना अडचणी होत आहेत. त्यातच कित्येकजण अद्याप ऑनलाईन आर्थिक व्यवहार करत नाहीत, हीच अडचण लक्षात घेत कोटक महिंद्रा बँकेने मुंबईत पहिली ‘एटीएम ऑन व्हील्स’ (ATM ON WHEEL) सुविधा सुरू केली आहे. कोटक बँकेच्या आणि इतर बँकांच्या ग्राहकांना या मोबाइल एटीएममधून (ATM) पैसे काढता येतील.
आठवड्यातील सर्व दिवस मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत ही सुविधा उपलब्ध राहणार असून, करोनाविरोधात एकत्र लढत असताना प्रशासनाने दिलेल्या दिशानिर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. शक्य तितके बाहेर पडू नये. कोटकच्या एटीएम ऑन व्हील्स सुविधेमुळे मुंबईतल्या नागरिकांना त्यांच्या परिसरात पैसे काढण्याची सुलभ सुविधा मिळेल, अशी माहिती कोटक महिंद्रा बँकेचे प्रेसिडेंट-प्रोडक्ट्स, अल्टरनेट चॅनेल आणि कस्टमर एक्स्परियन्स डिलिव्हरी पुनीत कपूर यांनी दिली.
https://thebusinesstimes.in/sbi-no-transaction-charges-on-cash-withdrawl-from-other-bank-atms/
सर्व ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्क वापरणे, एटीएमच्या वापरापूर्वी सर्व ग्राहकांना सॅनिटायझर देणे, ठराविक अंतराने एटीएमचे निर्जंतुकीकरण, एटीएमच्या रांगेत उभे असलेल्या ग्राहकांनी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवणे यासारख्या सर्व प्रकारच्या खबरदारींचे कठोर पालन केले जाणार आहे, असे कपूर यांनी सांगितले. कोटक त्यांची एटीएम ऑन व्हील्सची दुसरी सुविधा पुढच्या आठवड्यात नवी दिल्लीत सुरू करणार आहे, असे त्यांनी सांगितले.