‘कौरा’ने दिले महाराष्ट्राला १० हजार इनहेलर्स 

मुंबई :
‘कौरा’ कंपनीने महाराष्‍ट्र सरकारला १०,००० मेडिकल ग्रेड इनहेलर्स दान केल्याचे जाहीर केले. दान करण्‍यात आलेल्‍या या इनहेलर्सच्‍या वितरणामागे या संकटाच्‍या काळामध्‍ये जगभरात कोविड-१९च्‍या लक्षणांचे निर्मूलन करण्‍यासाठी मागणी वाढली असताना भारतीय अधिका-यांना पुरवठा करण्‍यामध्‍ये साह्य करण्‍याचा उद्देश आहे.विषाणूच्‍या संपर्कात आलेले आणि पूर्वीपासून श्‍वसनविषयक आजार असलेले किंवा नसलेले रूग्‍ण श्‍वास घेण्‍यामध्‍ये होणा-या त्रासापासून आराम मिळण्‍यासाठी महत्त्वाचा उपाय म्‍हणून पीएमडीआयवर (प्रेशराईज्‍ड मीटर डोस इनहेलर्स) अवलंबून असण्‍याचे प्रमाण वाढत आहे.

शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात तेजीने

सध्‍याच्‍या कोविड-१९ विषाणूविरोधातील लढ्यामध्‍ये कौराचे कार्य महत्त्वाचे आहे. दमाव क्रोनिक ऑब्‍स्‍ट्रक्टिव्‍ह पल्‍मनरी डिसीज (सीओपीडी)साठी दररोज १०० दशलक्ष व्‍यक्‍तींद्वारे वापरण्‍यात येणारे जगातील ८० टक्‍के मेडिकल ग्रेड इनहेलर्स कौराने उत्‍पादित केलेल्‍या प्रोपेलेंट गॅसने युक्‍त आहेत.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here