आता भारतातच बनणार ‘प्रोजेस्टेरॉन – स्टिरॉइड’

progesterone

‘लासा सुपरजेनेसिस’ला मिळाली परवानगी

मुंबई: 
प्रजननामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या स्त्री अंडाशयातील ‘प्रोजेस्टेरॉन’ (progesterone) हे स्टेरॊईड तयार करण्यासाठी ‘लासा सुपरजेनेसिस ली.’ला अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी मिळाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकानुसार कंपनीच्यावतीने हे स्टेरॉईड बनवण्यात येणार असून, महाराष्ट्रातील महाड येथील आस्थापना सदर संशोधन आणि निर्मिती होणार आहे.
progesterone LASA, tbt
अत्यंत वैशिट्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जगभरात अशाप्रकारे प्रोजेस्ट्रेरॉन स्टेरॉईड बनवणाऱ्या अत्यंत मोजक्या संस्थांमध्ये आता ‘लासा’ असणार असून, या संदर्भातील आवश्यक त्या चाचण्या आम्ही यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. दरम्यान आम्हाला सरकारची परवानगी मिळाल्यामुळे आता याच महिन्यापासून यावर आम्ही प्रत्यक्ष निर्मितीला सुरुवात करणार असल्याचे, ‘लासा’चे अध्यक्ष डॉ. ओमकार हेर्लेकर यांनी सांगितले. भारताला या स्टेरॉईडसाठी प्रामुख्याने चीनवर अवलंबून रहावे लागत होते. चीनमधील हुवेई प्रांतात सुमरे ४०० दशलक्ष डॉलरच्या हार्मोन आणि स्टिरॉईडचा व्यवहार होतो. जो एकूण बाजारपेठेच्या दोन तृतीयांश इतका आहे.  पण कोविड १९ च्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे ज्या २६ औषधांच्या आयातीवर निर्बंध आले आहेत त्यामध्ये प्रोजेस्ट्रेरॉनचादेखील समावेश आहे. अशा पार्श्वभूमीवर आता भारतामध्येच या स्टेरॉईडची निर्मिती करण्याची संधी ‘लासा’ला मिळणे ही देशासाठी आणि आमच्यासाठी खूप महत्वाची बाब असल्याचे डॉ. हेर्लेकर यांनी यावेळी नमूद केले.  देशात २५० मेट्रिक टन इतकी प्रोजेस्टेरॉनची बाजारपेठ असून, त्यांना प्रामुख्याने चीनकडूनच पुरवठा होतो. त्याचवेळी हे हि लक्षात घेतले पाहिजे कि, देशातील स्थानिक गरज भागवल्यानंतर इतर देशांनाही आपण प्रोजेस्टेरॉईनचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत, कारण याची जागतिक बाजारपेठ हि सुमारे ८० दशलक्ष डॉलर इतकी असल्याचेही डॉ. हेर्लेकर यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here