मुंबई:
लग्रों इंडिया या इलेक्ट्रिक आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधील कंपनीने कोलकाता, ओडिशा आणि छत्तीसगढमध्ये क्वारंटाईन सेंटर्स आणि आयसोलेशन वॉर्ड्स सुरू करण्यासाठी स्थानिक सरकारांना पाठबळ देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. देशभरातील विविध शासकीय भागधारकांच्या साह्याने ही कंपनी आयसोलेशन वॉर्ड आणि क्वारंटाईन सेंटर्स उभारताना वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक उत्पादनांचा पुरवठा करत आहे.
स्थलांतरित नागरिक आपापल्या मूळ स्थानी परतत असताना त्यांच्यासाठीच्या संबंधित क्वारंटाईन सुविधांमध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून लग्रोंतर्फे सरकारी इस्पितळे आणि क्वारंटाईन सेंटर्समध्ये डिस्पोसेबल आयसोलेशन बेड्स पुरवले जात आहेत. देशभरातील हॉस्पिटल्स आणि आरोग्य केंद्रामध्ये प्रोटेक्शन डिव्हाइसेस (सुरक्षा उपकरणे), वायरिंग सामुग्री आणि युपीएस पुरवून या टीमने आपले साह्य देऊ केले आहे. यात कोविड-19 रुग्णांसाठीच्या 2000 हून अधिक बेड्स आणि इंटेंसिव्ह केअर सुविधांचा समावेश आहे.
टाटा उभारणार महाराष्ट्र आणि यूपीत कोविड रुग्णालये
आरोग्यसेवेवर भर देत ही कंपनी तामिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली आणि केरळ या राज्यांमधील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई पुरवून आघाडीवरील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोविड-19 विरुद्धच्या लढ्यामध्ये पाठबळ देत आहे. लग्रोंतर्फे कोविड-19 विरोधातील या लढ्यात देशभरातील विविध समुदायांना साहय करण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या महासंकटाचा सामना करण्यासाठी आरोग्यसेवेसोबतच लग्रों इंडियाने इलेक्ट्रिशियन, पत्रकार (चेन्नई प्रेस क्लब), स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, गाड्यांचे चालक आणि पोलिस कर्मचाऱ्यांना 2.6 लाख पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट देऊ केले आहेत.
गोव्यात आता ‘स्मार्ट वॉक-इन ‘कोरोना’ सॅम्पल किऑस्क’
‘एक सामाजिकिरत्या जबाबदार संस्था म्हणून आम्ही लग्रोंमध्ये नेहमीच आरोग्य आणि सुरक्षा या मुद्द्यांना प्राधान्यक्रम दिला आहे. देशभरात क्वारंटाईन सेंटर्स आणि आयसोलेशन वॉर्डांच्या संदर्भात पायाभूत सुविधांची फार गरज निर्माण झाली आहे आणि इलेक्ट्रिक आणि डिजिटल बिल्डिंग इन्फ्रास्ट्रक्चरमधील तज्ज्ञ म्हणून आम्ही ही दरी भरून काढत शक्य तितके अधिक साह्य करण्यासाठी सरकारी भारधारकांसोबत काम करत असल्याचे लग्रों इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी टोनी बर्लांड यांनी सांगितले.
ताज्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा