‘लग्रों’ घेतेय स्थलांतरीत मजूरांची काळजी

मुंबई:
लग्रों इंडियाच्यावतीने मॅजिक बस फाउंडेशनच्या माध्यमातून आणि चेन्नई, महाराष्ट्र, हरिद्वार, झज्जर तसेच जळगावमधील स्थानिक प्रशासनाद्वारे स्थलांतरीत मजुरांना मदत करण्याच्या उद्देशाने सुक्या रेशनसाहित्याचे वाटप करण्यात आले. याशिवाय मॅजिक बस फाउंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजुरांना कोविड19च्या पार्श्वभूमीवर समाजात वावरताना शारीरिक अंतर राखण्याचे व स्वच्छतेबाबत जागरूक करण्यात येते आहे.
कंपनीच्यावतीने महाराष्ट्र राज्य प्रशासनाकडे 3550+ कामगारांसाठी सुके रेशन साहित्य पुरवले जाते आहे. त्याचप्रमाणे चेन्नई आणि भिवंडी येथील 1550 मजुरांना मॅजिक बस फाउंडेशनद्वारे कोविड 19 जनजागृती, समाजात वावरताना शारीरिक अंतर राखणे आणि स्वच्छतेचे धडे देण्यात येत आहेत. कोविड19 पासून संरक्षण करण्यासाठी रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि स्थलांतरीत कामगार कल्याणाच्या अनुषंगाने लग्रोंतर्फे सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयी जागरुकता निर्माण करण्यात येते आहे. ही टीम आपल्या इलेक्ट्रीकल उत्पादनामार्फतही मदत उपलब्ध करून देते आहे. देशभरातील रुग्णालये तसेच आरोग्य देखभाल सुविधांना संरक्षण उपकरणे, वायरींग उपकरणे आणि युपीएसचा पुरवठा करण्यात येतो आहे. आरोग्य देखभालीवर आपले लक्ष केंद्रित करून ही कंपनी कोविड19 सोबत मुकाबला करण्यासाठी तामिळनाडू, महाराष्ट्र, दिल्ली आणि कर्नाटक राज्यातील डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी वर्गाला पीपीई पुरवत आहे.

मारुती सुझुकी देणार दरमहा १०,००० मोफत व्हेंटिलेटर्स

कोविड19 साह्याबाबत बोलताना ग्रुप लग्रों इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ टोनी बरलँड म्हणाले की, “स्थलांतरीत मजूर आणि रोजंदारीवर काम करणाऱ्यांच्या मुलभूत गरजांच्या मागण्यांकडे आमचे लक्ष आहे. आम्ही देशभरात राज्य सरकारसमवेत कार्यरत असू काळाची गरज आणि तफावत यांच्यातील दुवा साधण्याचा शक्य तितका अधिकाधिक प्रयत्न करत आहोत.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here