मुंबई :
लेग्रँड इंडियाच्यावतीने लेग्रँड डेटा सेंटर सोल्यूशन्सच्या शुभारंभाची घोषणा करण्यात आली. या माध्यमातून लेग्रँड, न्यूमेरिक, रारीतान अँड सर्वर टेक्नोलॉजी या वैश्विक ब्रँडचा पोर्टफोलियो एका खास टीम अंतर्गत आणला. एलडीसीएस’च्या निर्मितीमुळे वाढीला कमाल लवचिकता प्राप्त होणार आहे, सोबतच कंपन्यांना सहजतेने आणि किफायतशीर पद्धतीने विस्तारण्याची संधी राहील,कमीतकमी कालावधीत तंत्रज्ञान तसेच अॅप्लिकेशन सुधारणे किंवा बदलणे शक्य होईल. लेग्रँड डेटा सेंटर सोल्यूशन्स आटोपशीर, मोजण्यायोग्य आणि कस्टमायजेबल (स्वत:च्या पसंतनुरूप उपलब्ध) आहेत, तसेच ती आगामी वेग लक्षात घेऊन तयार केली आहेत.
ग्रँड डेटा सेंटर सोल्यूशन्स सुलभ पद्धतीचे, कस्टमाईज्ड डेटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर सोल्युशन एकाच छताखाली उपलब्ध करून देत आहेत. सोबतच विशिष्ट उत्पादन किंवा ब्रँड निवडीची लवचिकता देण्यात येते. याचे डिझाईन वापरकर्त्याला नजरेत ठेवून तयार करण्यात आले असून यामधील लवचीक पायाभूत सुविधा ही वैशिष्ट्ये म्हणता येतील. एलडीसीएस’ने बाजाराचे रुपये 3000 कोटींचे आकारमान लक्षात घेतले आहे. आगामी 3 ते 5 वर्षांच्या कालावधीत पसंतीचा विक्रेता होण्याचे एलडीसीएस’चे उद्दिष्ट आहे. ही टीम एलडीसीएस व्यवसाय कामकाजाला साह्य करण्यासाठी स्थापन करण्यात आली. तसेच भारतातील डेटा सेंटर उद्योगाशी संबंधित घटकांसाठी सर्व समूह (वैश्विक) उत्पादने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
डेटा सेंटरमध्ये गुंतागुंतीच्या अॅप्लिकेशनचे होस्टींग चालते. इथे अतिशय कठीण कामकाज सुरू असते. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा लागते. त्याचप्रमाणे गरजा नेहमीच वाढत असतात.स्वत:च्या आवश्यकतेनुरूप पर्याय एखाद्याकरिता गरजेचा ठरतो. कामगिरी आणि कार्यकुशलता महत्त्वाची असते. ही गरज ओळखून एलडीसीएसने सर्वसमावेशक डेटा सेंटर तयार केली आहेत. त्यात हायपर स्केल ते मायक्रो डेटा सेंटरचा समावेश आहे. याद्वारे विविध प्रकारचे सर्वर आणि नेटवर्क रॅक, सर्व स्थितीत उच्च-कार्यक्षम कुलिंग पर्याय, उद्योग क्षेत्राला आवश्यक उच्च कामगिरीक्षम पीडीयु आणि स्वीच कमीतकमी सुरक्षेकरिता कोणतेही इन्स्टॉलेशन कॉन्फीगरेशन आणि तपास/डिटेक्शन तसेच नियंत्रणकंट्रोल आणि संरक्षण पर्याय देऊ केले जातील. केवळ इतकेच नाही, तर पूर्ण क्षमतेचा तीन फेज युपीएस वैविध्यपूर्ण सोपी, सुरक्षा प्रदान करतो. ज्याला भारतीय संशोधन आणि विकासाचे तसेच निर्मिती क्षमतेचे पाठबळ आहे. कोणत्याही उद्योगक्षेत्राकडून या पर्यायाला पसंती मिळणार आहे. एलडीसीएस’मध्ये ऑल-इन-वन मायक्रो डेटा सेंटर सोल्यूशन्सचा समावेश असून याद्वारे छोट्या कार्यालयांना संपूर्ण आणि आटोपशीर सर्वर रूम साहित्य देऊ करण्यात येते.
महाराष्ट्र स्टार्टअप वीकमध्ये कर्झा टेक्नोलॉजीची निवड
एलडीसीएसच्या ग्राहकांमध्ये ग्लोबल डेटा सेंटर सोल्यूशन्सकरिता जागतिक स्तराच्या कंपन्या, जसे की अमेझॉन, गुगल, मायक्रोसॉफ्ट, कोल्ट आणि इक्विनॉक्सचा समावेश आहे. लेग्रँड इंडियाच्या वतीने आगामी व्यवसाय कामकाज तसेच ब्रँड पोर्टफोलियोविषयी बोलताना एमडी आणि सीईओ टोनी बेरलँड म्हणाले की, “भारतातील डेटासेंटर अतिशय वेगाने वाढत आहेत. आम्ही सुमारे 8.5% वाढीचे साक्षीदारआहोत. क्षेत्रातील कंपन्या डिजीटल स्वीकार करत आहेत. आमचे वैश्विक अस्तित्व, अनुभव, देऊ करण्यात येणाऱ्या सेवा आणि भारतातील सध्याचा ब्रँड पोर्टफोलियो पाहता ही वेळ आमचे उद्दिष्ट निश्चित करण्याची आणि भारतातील डेटा सेंटर बाजाराला साह्य करून त्याला आगामी काळाकरिता सुसज्ज करण्याची आहे, असे वाटते.”