नवी दिल्ली :
कोरोनामुळे ठप्प पडलेल्या अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी देशातील लोकसंख्येच्या मोठ्या भागाच्या हातात थेट पैसै पोहोचणं गरजेचं आहे. भारताने अमेरिका आणि इतर काही देशांप्रमाणे पॅकेज जाहीर करणं गरजेचं असून, लोकांच्या हाता पैसा खेळता राहील आणि बाजारातील मागणीही कमी होणार नाही असा सल्ला नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी माडंलं आहे. काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत केलेल्या व्हिडीओ संवादात ते बोलत होते.
केंद्र सरकारने एक यंत्रणा राबवण्याची गरज आहे. ज्यामध्ये केंद्र सरकार राज्य सरकारपर्यंत आर्थिक मदत पोहोचवणार आणि त्यानंतर ही मदत गरीबांपर्यंत पोहोचवली जाईल, असे सांगत यावेळी अभिजीत बॅनर्जी यांनी सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळत नसलेल्या लोकांपर्यंत मदत पोहोचवणं सर्वात मोठं आव्हान असल्याचं नमूद केले. स्थलांतरित कामगारांसारख्या लोकसंख्येसाठी अशी कोणतीही सुरक्षित योजना नसल्याचेही त्यांनी सांगितले.
‘गरिबांसाठी खर्च करावे लागणार ६५ हजार कोटी’
आधारचा वापर करत अशा लोकसंख्येपर्यंत पोहोचून त्यांना रेशन देता आलं असतं,” असंही बॅनर्जी यांनी यावेळी सांगितलं. अभिजीत बॅनर्जी यांनी केंद्र सरकारला सल्ला देताना ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी तात्पुरती रेशन सिस्टम उभी केली जाऊ शकतो असा सल्ला दिला आहे. लघू, मध्यम उद्योगांना पॅकेज देण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत.
“लोक सध्या खरेदी करत नसून अर्थव्यवस्था पुनर्जिवित करण्यासाठी खर्च करणे हा सर्वात सोपा उपाय आहे. रेड झोनमध्ये आहे म्हणून आपण संपूर्ण रिटेल सेक्टर बंद ठेऊ शकत नाही,” असं मत अभिजीत बॅनर्जी यांनी व्यक्त केलं आहे. “स्थलांतरित कामगारांची समस्या राज्य सरकार एकटं हाताळू शकत नाही. केंद्र सरकारने त्याची हाताळणी करायला हवी,” असंही ते म्हणाले आहेत.
अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज