‘लिबर्टी’ने साजरा केला वर्चुअल वर्धापन दिन

मुंबई :
लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड त्यांचा वार्षिक कार्यक्रम ‘ फ्लेम ऑफ लिबर्टी २०२० – पार्टनर डे ‘ यावर्षी पहिल्यांदाच वर्चुअल प्लॅटफॉर्म वापरून साजरा केला. लिबर्टी इन्शुरन्स भारतातल्या सगळ्यात मोठ्या जनरल इशुरंस कंपन्यांपैकी एक असून या कार्यक्रमांत जवळपास ३४६८ पार्टनर आणि एजंट्स त्यांच्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी होते.
कोरोना व्हायरस आणि त्याच्यामुळे असलेल्या लॉकडाऊनच्याच काळात इन्शुरन्स सेक्टर सह संपूर्ण अर्थव्यवस्थेला मोठा फटाका बसला आहे. पण या काळात त्यांचे पार्टनर आणि एजंट यांना थोडा दिलासा आणि मनोरंजन या हेतूने लिबर्टी इन्शुरन्स यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे. यात जादूचे प्रयोग, बीट बॉक्सिंग, फिटनेस सेशन्स, पाककला स्पर्धा आणि लहान मुलांसाठी कथा कथन अशी विविध वर्गवारी होती. 


आता असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही विमा संरक्षण

लिबर्टी इन्शुरन्स च्या सीईओ आणि संचालक रुपम अस्थाना यांनी या कठीण काळात आम्ही आमच्या सहयोगी लोकांसोबत ठामपणे उभे असल्याचे सांगितले. या कठीण काळात कंपनी सोबत असलेल्या सगळ्या सहायोग्यांना आम्ही धन्यवाद देत लवकरच या फेज मधून आपण बाहेर पडून प्रगती करू असेही मत त्यांनी व्यक्त केले.
लिबर्टी जनरल इन्शुरन्स यांनी २०१६ मध्ये त्यांच्या पार्टनर आणि एजंट्स साठी फ्लेम ऑफ लिबर्टी ही फ्लागशिप योजना सुरू केली. या योजनेद्वारे त्यांनी इन्शुरन्स सेक्टर मधील पार्टनर आणि एजंट्स याच्या रचनेत बदल घडवून आणले.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here