‘हे’ मास्क मारणार कोविडचे विषाणू 

​​मुंबई:
औषधशास्त्राच्या प्रगतीमुळे करोना विषाणूंचा नायनाट कसा करता येईल, याविषयी ऊहापोह सुरू आहे. या वैश्विक महामारीवर त्वरीत उपाय शोधणे आवश्यक आहे. साधारणपणे 65,000 हून अधिक प्रयोग राबवल्यावर आणि 100 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद केल्यानंतर स्वीस हायजीन कंपनी लिव्हींगार्डने भारतात कामकाजाला सुरुवात केली. त्यानुसार त्यांनी जंतू विषाणूंची सक्रियता कमी करणारे मास्क बाजारात आणले आहेत. हे मास्क नोवल करोनाव्हायरस सार्स-कोविड विषाणूंची सक्रियता 99.9% कमी करण्यात सफल ठरले आहेत. सध्या औषधालयांत किंवा बाजारात उपलब्ध असणारे मास्क प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापरण्यात येत आहेत. मात्र लिव्हींगार्ड कंपनीचे मास्क हे बचावात्मक तर आहेतच, शिवाय जंतू विषाणूंच्या प्रसारालादेखील अटकाव करतात. त्यामुळे असे मास्क वापरणारे आणि आसपासच्या व्यक्तींकरिता ते वरदान ठरणार आहेत. हे जागतिक पेटंटप्राप्त तंत्रज्ञान संजीव स्वामी या भारतीय वंशाच्या उद्योजकाने निर्माण केले असून ते या कंपनीचे प्रमुख आहेत. कापड आणि उपचारीत लिव्हींगार्ड तंत्रज्ञान यांच्या संयोगामुळे काहीच तासांत सार्स-कोविडचे कण मोठ्या प्रमाणावर कमी होतात असे फ्री युनिव्हर्सिटी ऑफ बर्लिन येथील इन्स्टिट्यूट फॉर अॅनिमल हायजीन अँड एन्व्हायर्नमेंटल हेल्थमधील संशोधकांनी घेतलेल्या शोधात आढळून आले. 
आता घ्या ऑनलाईन पदवी शिक्षण

आज या मास्कचे व्हर्च्युअल पद्धतीच्या पत्रकार परिषदेत अनावरण करण्यात आले. ज्यामध्ये स्वत: संस्थापक त्यांच्या स्वीस मुख्यालयातून सहभागी झाले होते.लिव्हींगार्ड टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि सीईओ संजीव स्वामी म्हणाले की, “महामारी दरम्यानच्या काळात 89 दशलक्ष मेडीकल मास्कची आवश्यकता भासणार असल्याचा अंदाज जागतिक आरोग्य संघटनेकडून व्यक्त करण्यात आला. दैनंदिन जीवन सर्वोत्तम दर्जाचे असण्याच्या दिशेने आमचे उद्दिष्ट असणार आहे. आधुनिक जगाला साजेशी स्वच्छता राखण्याचे आमचे ध्येय आहे. या कारणास्तव आम्ही उच्चतम मानकाकरिता प्रसिद्ध असलेल्या एफयु बर्लिन येथे उत्पादन चाचणी केली. लिव्हींगार्ड मास्कचे अद्वितीय वैशिष्ट्य म्हणजे त्यामुळे वापरकर्त्यांना अभूतपूर्व सुरक्षा प्रदान होते.
हे मास्क धुवून पुन्हा वापरण्यासारखे आहे. ते बहुतांशी सुती कापडाने तयार करण्यात आले आहे. हे मास्क पर्यावरणस्नेही आणि शाश्वत आहे. जर लक्षावधी लोकांनी एक पुन्हा वापरता येईल अशाप्रकारचा लिव्हींगार्ड मास्क 210 वेळा वापरला तर आपण 36,000 टन कचरा निर्मितीला अटकाव करू असे आमच्या एका संशोधनातून स्पष्ट होते. नियमित मास्कच्या तुलनेत हा मास्क स्वस्त आहे. कारण आमच्या एका मास्कच्या तुलनेत एका व्यक्तीला 210 साधारण मास्कची नियमितपणे आवश्यकता भासू शकते.”
ख्यातनाम शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, संपर्कातून पसरणाऱ्या सार्स कोविडविषाणूला निष्क्रिय करण्यासाठी मास्कचा उपयोग केला जावा, असा जो वैज्ञानिक शोध लावला गेला आहे त्याला जगभरातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांनी मान्यता दिल्याने आता जागतिक स्तरावरील दृष्टीकोन बदलला आहे.  सध्याच्या या महामारीच्याही पुढील विचार करुन बचाव, सुरक्षितता आणि टिकाव या दृष्टीने या अभूतपूर्व आमूलाग्र बदलाचा फायदा प्रत्येक भारतीयापर्यंत पोहोचवता यावा यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले गेले पाहिजेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here