मुंबई-पुण्यात लॉकडाउन १८ मे पर्यंत?

mumbai, rajesh tope

मुंबई :
४ मे रोजी देशव्यापी लॉकडाऊन संपल्यानंतरही राज्यातील पुणे-मुंबई (pune – mumbai)शहरातील निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. दोन्ही शहरातील लॉकडाऊनचा कालावधी १८ मेपर्यंत वाढवला जाऊ शकतो, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे महाराष्ट्रात असून मुंबई (mumbai) आणि पुण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा सर्वाधिक आहे. कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता देशव्यापी लॉकडाऊनचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर या दोन्ही शहरातील निर्बंध  कायम ठेवावे लागू शकतात, असे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 
mumbai
दुकाने सुरु करण्याला केंद्राची सशर्त परवानगी

कोरोना विषाणूचे वेगाने होणारे संक्रमण रोखण्याच्या उद्देशाने लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. संक्रमणाचा वेग कायम असेल तर लॉकडाऊन वाढवण्याशिवाय अन्य कोणता पर्याय नसेल, असे राजेश टोपे यांनी ​एका​ दैनिकाला दूरध्वनीवरुन दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. झोपडपट्टी असलेल्या भागात कोरोनाच्या केसेस झपाट्याने वाढत आहेत. सर्व कंटेन्मेंट झोन पूर्णपणे बंद आहेत की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. गरज पडल्यास ३ मेनंतर फक्त (mumbai) मुंबई, पुण्यातील कंटेन्मेंट झोनमध्ये आम्ही आणखी १५ दिवसांसाठी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घ्यावा लागू  शकतो, असेही ते म्हणाले.

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here