‘…तर लाखो भारतीय गरिबीच्या फेऱ्यात’

indian, economy

नवी दिल्ली :
‘लॉकडाउनचा कालावधी वाढला तर लाखो भारतीय गरीबीच्या चक्रामध्ये अडकू शकतात’ अशी शक्यता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर दुव्वूरी सुब्बाराव यांनी रविवारी व्यक्त केली. “करोना व्हायरसचे संकट संपल्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था पुन्हा ‘व्ही’ शेपमध्ये येईल. अन्य देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये चांगली सुधारणा दिसून येईल” अशी अपेक्षा सुब्बाराव यांनी व्यक्त केली. मंथन फाऊंडेशनने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये त्यांनी ही मते व्यक्त केली. आरबीआयच्या माजी डेप्युटी गव्हर्नर उषा थोरातही या वेबिनारमध्ये सहभागी झाल्या होत्या.  
INDIAN, ECONOMY
RBIचे म्युच्युअल फंड्सना 50 हजार कोटी

“भारतात यावर्षी निगेटिव्ह ग्रोथ होईल व विकास मंदावेल असा बहुतांश विश्लेषकांचा अंदाज आहे. करोनाचे संकट येण्याच्या दोन महिनेआधीच आपला विकासाची गती धिमी झाली होती. आता विकासाचे चक्र पूर्णपणे थांबले आहे. मागच्यावर्षी विकास दर पाच टक्के होता. कल्पना करा, मागच्यावर्षी पाच टक्के आणि यावर्षी निगेटिव्ह किंवा शून्य विकास दर राहिला तर विकास दरात थेट पाच टक्क्यांची घसरण नोंदवली जाईल” असे सुब्बाराव म्हणाले.
“दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारत या संकटकाळात चांगली कामगिरी करणार हे खरं आहे. पण ही समाधानकारक बाब नाही. कारण आपला देश गरीब आहे. हे संकट असेच राहिले किंवा लॉकडाउन उठवला नाही तर, लाखो लोक गरीबींच्या चक्रामध्ये अडकू शकतात” असे सुब्बाराव म्हणाले.

अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here