एल अँड टीतर्फे कोरोना लढ्यासाठी 40 कोटींची वैद्यकीय मदत

corona, L&T

मुंबई :
कोव्हिड 19 विरोधात भारत देत असलेल्या लढ्यात मदत करण्यासाठी लार्सन अँड टुब्रो (L&T) या भारतातील तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन आणि आर्थिक सेवा क्षेत्रातील क्षेत्रातील आघाडीच्या समूहाने आपल्या कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीचा एक भाग म्हणून 40 कोटी रुपयांचे कोव्हिड डायग्नोस्टिक किट्स, पीपीईज, एन95 मास्क आणि इतर वैद्यकीय उपकरणे दान करण्याचे ठरवले आहे. यापूर्वी कंपनीने 30 मार्च रोजी पीएम- केयर्स फंडासाठी 150 कोटी रुपये दान केले होते तसेच देशभरातील 160,000 कंत्राटी कामगारांसाठी प्रती महिना 500 कोटी पुरवण्याची घोषणा केली होती.
या घडामोडीविषयी लार्सन अँड टुब्रोचे (L&T) मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक एसएन सुब्र्हमण्यम म्हणाले, ‘या संकटसमयी आम्ही केंद्रीय आणि राज्य सरकारला पाठिंबा देत असून कोव्हिड- 19 विरोधात लढा देण्यासाठी शक्य ती सर्व मदत करत आहोत. एक जबाबदार कॉर्पोरेट सिटीझन या नात्याने आम्ही या साथीविरोधात लढण्यासाठी अतिशय आवश्यक असलेले कोव्हिड डायग्नोस्टिक किट्स, पीपीईज, एन95 मास्क आणि व्हेंटिलेटर्ससारखी महत्त्वाची वैद्यकीय उपकरणे दान करत आहोत. ही यापूर्वी आम्ही पीएम- केयर्स फंडासाठी दिलेल्या 150 कोटी रुपयांपेक्षा वेगळी मदत असून त्याशिवाय आम्ही प्रशासनाला इतर वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करण्यासाठी मदत करत आहोत.’
(L&T) कंपनीने महाराष्ट्र, तमिळ नाडू, गुजरात, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आसाम आणि तेलंगणा या राज्य सरकारअंतर्गत काम करणाऱ्या विविध आरोग्यसेवा संस्थांसाठी 45 हजार पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट (पीपीईज) देण्याचे ठरवले आहे. त्याशिवाय मध्य प्रदेश, बिहार, गुजरात, तेलंगणा, तमिळ नाडू आणि महाराष्ट्रातील आरोग्य संघटनांसाठी 151,000 एन- 95 मास्क दिले जाणार आहेत.
corona, L&T
कंपनीने यापूर्वी तमिळनाडू आरोग्य विभागातर्फे चालवल्या जाणाऱ्या चेन्नईतील प्रीव्हेंटिव्ह मेडिसीन अँड रिसर्च संस्थेला 100 सेमी फॉलर बेड्स व गाद्या, 2 व्हेंटिलेटर्स, 7 बिपाप व्हेंटिलेटर्स आणि 20 मल्टीपॅरामीटर मॉनिटर्स दिले आहेत. लवकरच त्यांना 8 व्हेंटिलेटर्सही पुरवले जाणार आहेत. कंपनीतर्फे बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील राज्य आरोग्य प्रशासनासाठी 12 व्हेंटिलेटर्सही दान करण्याचे ठरवले आहे.
एल अँड टी (L&T) तर्फे पुणेस्थित मोलेक्युलर डायग्नोस्टिक कंपनी- मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशन्सतर्फे बनवण्यात आलेले 155 मेक इन इंडिया टेस्ट किट्स केंद्रीय आणि राज्य सरकारला दिले जाणार आहेत. प्रत्येक किटमध्ये 100 चाचण्या करण्याची क्षमता असून आयात केल्या जाणाऱ्या इतर किट्सच्या तुलनेत या किटद्वारे अतिशय कमी वेळेत म्हणजेच केवळ 2.5 तासांत संसर्गाचे निदान केले जाते.

https://thebusinesstimes.in/corona-will-destroy-nri-layman-laborers/

जागतिक आरोग्य संघटनेनुसार करोनाविषाणूची लक्षणे दिसणाऱ्या लोकांची चाचणी करणे हा या साथीशी लढण्याचा सर्वात चांगला मार्ग आहे. मात्र, जगभरात या टेस्टिंग किट्सचा तुटवडा जात असून जगभरातील प्रयोगशाळा हाताशी असलेल्या पुरवठ्यावर अवलंबून राहात काम करत आहेत किंवा संशयित केसेसचे निदान करण्याची पुरेशी क्षमता त्यांच्याकडे नाही. भारताने कोव्हिड- 19 चे स्क्रीनिंग करण्यासाठी अधिकाधिक टेस्ट किट्स वापरात आणले पाहिजेत आणि एल अँड टीसारख्या कॉर्पोरेट त्यासाठी योगदान देत आहेत.
लॉकडाउनदरम्यान रोजंदारी कामगारांना विविध समस्या जाणवत असून एल अँड टीने 1966 कुटुंबांना किराणा माल, तर मुंबईतील 8000 लोकांना आपल्या एनजीओ भागिदारांच्या माध्यमातून जेवण पुरवले आहे. त्याशिवाय कंपनी गेल्या दोन आठवड्यांपासून डॉक्टर्स, स्वच्छता कर्मचारी, चेन्नईतील सार्वजनिक हॉस्पिटल्समध्ये अडकलेली कुटुंबे मिळून 2000 जणांना जेवण देत आहे. त्याशिवाय तमिळ नाडू राज्याच्या राजधानीत स्थलांतरित कामगारांना 20,000 जेवण पुरवण्यात आले आहे.
CORONA, L&T

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here