‘ल्युमिकाई’ने आणला पहिला इंटरअॅक्टीव्ह व्हीसी फंड

gaming


मुंबई :
‘ल्युमिकाई’ने भारतातील वेगाने वाढणारी गेमिंग आणि इंटरअॅक्टीव्ह बाजारपेठ लक्षात घेऊन नवीन अर्ली स्टेज वेंचर कॅपिटल फंडची घोषणा केली. या फंडाला जपान, फिनलंड, युएस आणि दक्षिण कोरियामधील बड्या गेमिंग आणि तंत्रज्ञान कंपन्यांसह जगभरातील गुंतवणूकदारांचे पाठबळ असून पहिल्यांदाच भारतातील इंटरअॅक्टीव्ह एंटरटेनमेंट मार्केटमध्ये दीर्घकालीन भांडवल गुंतवण्यात येते आहे. ल्युमिकाई फंड हे भारतातील 300 हून अधिक स्थानिक गेमर्स आणि वैश्विक प्रेक्षकांकरिता मेड इन इंडिया – इंटरअॅक्टीव्ह कंटेंट (मनोरंजक मजकूर), टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान), टूल्स (अवजारे) आणि इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा) परिघात अग्रगण्य असलेल्या नवीन संस्थापक पिढीला वेगाने चालना देण्याच्या अनुषंगाने उभारण्यात येत आहेत.
ल्युमिकाईची स्थापना जनरल पार्टनर्स जस्टीन श्रीराम किलिंग (कॉमकास्ट-जी4, फॉक्स इंटरअॅक्टीव्ह मीडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर, डिस्ने युटीव्ही गेम्सचे कॉर्पोरेट स्ट्रॅटेजी हेड) आणि सलोनी सेहगल (लंडन वेंचर पार्टनर्स (एलव्हीपी), गेम्स आंतरप्रीन्यूएर, मॉर्गन स्टॅन्ले अॅन्ड बारक्लेज)चे फॉर्मर एम अॅन्ड ए बँकर) यांनी केली. या सगळ्यांचा एकत्रित कामकाजाचा अनुभव, ग्लोबल संपर्क, उद्योगदृष्टी आणि गुंतवणुकीचा तब्बल 40 अनुभव आहे. यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ल्युमिकाई हा भारताचा पहिला प्रबंध-आधारीत गेमिंग आणि इंटरअॅक्टीव्ह एंटरटेनमेंट फंड म्हणून उदयाला आला.   
“भारताचे 300+ दशलक्ष यूझर गेमिंग मार्केट हे ग्लोबल इन्फ्लेक्शन पॉईंटचे प्रतिनिधित्व करते, नानाविध गुणीजनांना अभिनव संधी उपलब्ध झाली आहे. अब्जावधी युवा, मनोरंजनाची भूक असलेल्या उपभोक्त्यांना जगातील सर्वात स्वस्त डेटा आणि गुंतागुंत-मुक्त मोबाईल पेमेंटची सोय उपलब्ध होणार आहे – आपल्याकडे जगाच्या तुलनेत सर्वात सर्जनशील, कोवळे तरीही परिपक्व तांत्रिक प्रतिभा असलेल्या तरुणांचे मोठे पाठबळ लाभले आहे” असे ल्युमिकाई जनरल पार्टनर जस्टीन श्रीराम किलिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, “हा भारताचा गेमिंग परिसंस्थेकरिता समर्पित स्वरुपाचा दीर्घकालीन भांडवल तसेच धोरणात्मक भागीदार आहे, यामुळे भारताच्या महत्त्वाकांक्षी संस्थापकांच्या नव्या सोनेरी युगाला मदत करण्याचे ल्युमिकाईचे उद्दिष्ट साकार होईल. ज्यामुळे जगभरात मनोरंजन क्षेत्रातील कल्पकतेला चालना मिळणार आहे.”
‘रुटर’चा गेमिंग आणि ई स्पोर्ट्स क्षेत्रात प्रवेश
gaming
“पारंपरिकपणे, वैश्विक वित्त क्षेत्र हे गेमिंग उद्योग क्षेत्राकडे एक मोठा चालना देणारा व्यवसाय म्हणून पाहतो आहे. भारतातदेखील, गेम निर्मिती करणाऱ्यांकडे आर्थिक पाठबळ नसते. त्यामुळेच या क्षेत्रात आमचा लवकरात विजयश्री खेचून आणणाऱ्या मोठा परतावा देणाऱ्या पोर्टफोलियो अप्रोचवर अतिशय भरवसा आहे.” अशी माहिती ल्युमिकाई जनरल पार्टनर, सालोनी सेहगल यांनी दिली. “इंटरअॅक्टीव्ह मीडियामध्ये गुंतवणुकीकरिता सूक्ष्म बारकावे आणि विशेष द्रष्टेपणा आवश्यकता ठरतो. आमचा प्रयत्न हा भांडवलापलीकडे आहे. गेमिंगमध्ये यश मिळवायचे असल्यास स्थानिक अंदाज, जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींचे ज्ञान, वेगवान पुनरावृत्ती, सर्वोच्च गुणवत्तेच्या प्रतिभेची उपलब्धतता आणि वितरणासाठी तसेच बाजारातील व्यवहारांसाठी समर्पक रणनितीचा वापर यांची गरज असते, हे आम्हाला ठाऊक आहे. आमचे स्थानिक आणि जागतिक पातळीवरील संपर्क, त्यासोबत आमच्या वैश्विक एलपी बेसकडून मिळणारी माहिती; भारतात आणि जगात स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याच्या दृष्टीने अतिशय मोलाची भूमिका बजावणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here