मुंबई:
महिंद्रा अॅण्ड महिंद्रा फायनान्शिअल सर्विसेस लिमिटेड या फायनान्स कंपनीतर्फे आपले राइट्स इश्यू 28 जुलै 2020 रोजी खुले केले जाणार आहेत.
कंपनीतर्फे प्रत्येकी 2 रु. या मूळ किमतीचे 617,764,960 पूर्णपणे पेड-अप इक्विटी समभाग प्रत्येक इक्विटी समभागाला 50 रु. (प्रत्येक इक्विटी समभागामागे 48 रुपयांचा प्रीमिअम समाविष्ट) या दराने जारी केले जातील. 23 जुलै 2020 रोजी इक्विटी समभागधारकांकडे असलेल्या प्रत्येक पूर्णपणे पेड-अप इक्विटी समभागासाठी एक इक्विटी समभाग या प्रमाणात समभाग जारी करून त्यातून एकूण 30,888,248,000 रुपये इतके भांडवल उभे केले जाणार आहे. या निधीतून कंपनीची काही थकबाकी फेडण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे दीर्घकालीन भांडवलात वाढ केली जाईल आणि कंपनीच्या व्यावसायिक घडामोडींसाठीच्या निधीची तजवीज केली जाईल आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्देशांसाठी हा निधी वापरला जाईल.
१०० दशलक्ष विद्यार्थ्यांना मिळणार ‘उच्च’ शिक्षण
या समभागांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांनी बीएसई, एनएसई आणि सेबीकडे दाखल केलेल्या 21 जुलै 2020 च्या पत्रातील पान क्र. 338 आणि 20 वरील अनुक्रमे ‘टर्म्स ऑफ द इश्यू’ सह ‘रिस्क फॅक्टर’ या मुद्द्यांचा संदर्भ घ्यावा.
कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड, बीएनपी पारिबास, सिटीग्रूप ग्लोबल मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड, एचडीएफसी बँक लिमिटेड, एचएसबीसी सेक्युरिटीज अॅण्ड कॅपिटल मार्केट्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, आयसीआयसीआय सेक्युरिटीज लिमिटेड, नोमुरा फायनान्शिअल अॅडव्हायझरी अॅण्ड सेक्युरिटीज (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लिमिटेड यांनी राइट्स इश्यूसाठी लीड मॅनेजर्स म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…