‘वेतन आणि भत्त्यापलीकडे विचार करताहेत कमर्चारी’

mahndra

मुंबई:
कर्मचारी या भूमिकेत असलेल्या व्यक्ती  ‘गुड एम्प्लॉयर’ ठरवताना केवळ वेतन व भत्ते यापलीकडे विचार करत आहेत आणि सामाजिक बाबतीत पुढाकार, कामाचे लवचिक तास, पर्यावरणाचा विचार आणि मनुष्यबळातील वैविध्य असे घटक विचारात घेत आहेत. स्त्री-पुरुष यांच्या दृष्टिकोनातून विचार करता, काही फरक आढळून आला. त्यातील काही निष्कर्ष  महिंद्रा समूहाने घेतलेल्या ‘गुड बिझनेस स्टडी’मध्ये निदर्शनास आले. 
रोजगाराच्या दृष्टिकोनातून, सहभागी झालेल्या जवळजवळ निम्म्या व्यक्तींनी (49%) ‘गुड बिझनेस’ ठरवताना वेतन व कर्मचारी लाभ, करिअर व प्रगतीसाठी संधी आणि हवामानातील बदलांविषयी धोरणे व पर्यावरणीय बांधिलकी असे घटक विचारात घेतले. देशातील महत्वाच्या शहरातील सुमारे दोन हजार व्यक्तीसोबत केलेल्या या सर्वेक्षणात पुढील प्रमाणे विविध महत्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत. 35% व्यक्ती ‘गुड’ म्हणता येणार नाही अशा कंपनीमध्ये काम करण्याची संधी ‘नेहमी’ नाकारणार आहेत.  
इतक्याच प्रमाणात, 34% व्यक्तींनी म्हटले की, ते भविष्यात नव्या नोकरीची निवड करताना ‘गुड’ सामाजिक घटक विचारात घेतील, जसे पर्यावरणविषयक चांगली धोरणे, समावेशकता व नीतिमत्ता, आणि सीएसआर कार्यक्रम.
याचबरोबर, बिझनेस ‘गुड’ नाही वाटला तर 81% महिला नोकरीची संधी नाकारतील, या तुलनेत पुरुषांचे प्रमाण 74% आहे.
आज, ‘गुड बिझनेस’ ही संज्ञा ‘वित्तीय कामगिरी’, ‘मार्केट लीडरशिप’, ‘नफात्मकता’ किंवा ‘वाढ’ अशा व्यवसायविषयक पारंपरिक निकषांच्या अगोदर ‘नैतिक मापदंड’, ‘समाजाचा काळजीपूर्वक विचार करणे’, आणि ‘समावेशकता’ अवलंबणे याच्याशी निगडित आहे. 
सहभागी झालेल्यांपैकी 62% जणांच्या मते, ‘गुड बिझनेस’चा अर्थ आर्थिक परताव्यापुरता मर्यादित नसतो, 14% जणांनी ‘गुड बिझनेस’चा अर्थ पर्यावरणाचा विचार आणि समाजाबद्दलची बांधिलकी (सीएसआर) अशा वैशिष्ट्यांशी जोडला.
18 ते 25 वर्षे वयोगटातील 45% हून अधिक तरुण भारतीय केवळ नफ्याचा विचार करण्यापेक्षा नैतिक मापदंड, समाजाचा काळजीपूर्वक विचार करणे व समावेशकता यांना प्राधान्य देतात. तर, सहभागी झालेल्यांपैकी 46 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती नफात्मकता, वाढ व मार्केट लीडरशिप अशा ‘व्यवहारविषयक’ व ‘कामगिरी’विषयक निकषांना अधिक महत्त्व देतात (सहभागी झालेल्यांपैकी 48%).
विशेष म्हणजे, टिअर 2 शहरांतील 46% जणांच्या मते ‘गुड बिझनेस’चा विचार करता त्यांच्या मनात सर्वप्रथम ‘समाजाचा काळजीपूर्वक विचार करणे (15%)’, ‘सामाजिक मापदंड (20%)’ व ‘समावेशकता (9%)’ हे मुद्दे येतात; या तुलनेत टिअर 1 शहरांतील 47% व्यक्ती गुड बिझनेसचा संबंध ‘आर्थिक कामगिरी’, ‘मार्केट लीडरशिप’, ‘नफात्मकता’ किंवा ‘वाढ’ यांच्याशी जोडतात.
mahndra
​भारतीय ग्राहकांची वैशिष्ट्ये कमालीची बदलत आहेत. त्यांच्या दृष्टिकोनातून, ते जेव्हा खरेदी करण्याचा निर्णय घेतात तेव्हा किंमत आणि उत्पादन याबरोबरच, पर्यावरण व दृष्टिकोन हेही विचारात घेतात. पाहणीत आढळल्याप्रमाणे, ग्राहक म्हणून ‘गुड बिझनेस’ची लोकांची व्याख्या अशी आहे की, विक्री होण्यासाठी उत्पादन व किंमत केवळ याच गोष्टी आता पुरेशा ठरत नाहीत:60% लोकांच्या मते, एखाद्या कंपनीची उत्पादने किंवा सेवा खरेदी करायच्या असतील तर त्यांच्या मते ती कंपनी ‘गुड’ असणे त्या कंपनीसाठी पायाभूत किंवा महत्त्वाचे आहे.
कंपनीची उत्पादने किंवा सेवा खरेदी करत असताना, किंमत व उत्पादन हे महत्त्वाचे असून, 20% व्यक्ती स्पर्धात्मक किंमत विचारात घेतात.
27% व्यक्ती खरेदी करण्यापूर्वी ब्रँडची प्रतिष्ठा विचारात घेतात, त्यानंतर मार्केट लीडरशिप किंवा उत्पादनाची किंमत पाहतात.
14% व्यक्ती ‘गुड’ डील ठरवत असताना उत्पादन किंवा सेवेचा पर्यावरणावर होणारा परिणाम तपासतात.
14% व्यक्ती इतकेच महत्त्व ब्रँडच्या समाजातील एकंदर योगदानाला देतात.
टिअर 1 शहरांतील 31% व्यक्तींच्या मते, कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी ते स्पर्धात्मक दर व मार्केट लीडरशिप विचारात घेतात, या तुलनेत टिअर 2 शहरामध्ये हे प्रमाण 34% असून इतक्या व्यक्ती खरेदी करण्यापूर्वी उत्पादनाची गुणवत्ता तपासतात.
सहभागी झालेल्या 39% महिलांच्या मते, सर्वप्रथम उत्पादनाची गुणवत्ता (वैशिष्ट्ये, उपयोग व पर्यावरणावरील परिणाम) विचारात घेतली जाते, तर या तुलनेत पुरुषांचे प्रमाण 24% आहे, आणि
34% पुरुष कोणतेही उत्पादन खरेदी करण्यापूर्वी सर्वप्रथम स्पर्धात्मक किंमत व मार्केट लीडरशिप विचारात घेतात, तर या तुलनेत असे करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण 22% आहे.

गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करता, आर्थिक परतावा आजही महत्त्वाचा आहे, परंतु अनेक गुंतवणूकदारांच्या मते केवळ हा एकच घटक पुरेसा नाही.
खरेच ‘गुड बिझनेस’ आहे असे वाटले नाही तर बहुतांश व्यक्ती (70%) त्यामध्ये कधीही गुंतवणूक करणार नाहीत. 20% जणांच्या मते, एखादा बिझनेस खऱ्या अर्थी ‘गुड’ ठरण्यामध्ये ‘नेतृत्व व दूरदृष्टी यांचा अभाव’ हे प्रमुख अडथळे येतात. ​
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांच्या मते, “‘गुड बिझनेस’ची व्यापक भूमिका, उद्देश आणि व्याख्या हे आज कमालीचे महत्त्वाचे ठरते आहे. कंपनीच्या बॅलन्सशीटइतकीच कंपनीच्या सामाजिक व लोकांवरील परिणामाची चर्चा उघडपणे व वारंवार केली जाते; आणि ही चर्चा करणाऱ्या लोकांची संख्या आधीपेक्षा बरीच वाढली आहे. ग्राहक असोत, भागधारक, कर्मचारी असोत किंवा समाजातील अन्य घटक असोत, त्यांच्या या वाढलेल्या, अधिक समावेशक अपेक्षा पूर्णपणे योग्य आहेत, असे मला वाटते. माझ्या दृष्टीने, बिझनेस लीडरची मुख्य भूमिका ही परस्परांसाठी फायदेशीर, सामायिक बाबी शोधणे व निवडणे ही आहे आणि हाच गुड बिझनेसचा गाभा आहे. आपल्या कॉर्पोरेटच्या वाटचालीमध्ये आणि प्रत्येक मैलाच्या टप्प्यावर अनेक व्यक्तींची साथ लाभलेली असते; मग ते खऱ्या अर्थी समावेशक वर्कप्लेस निर्माण करणे असो किंवा पर्यावरणावरील परिणाम कमी करणे असो; आमल्या समाजाबरोबर जोडलेले गहिरे नाते असो किंवा आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना प्रयोग करण्याचे (आणि, अगदी अपयशी होण्याचेही) स्वातंत्र्य देणे असो. त्यामुळे, 75व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने, माझ्या मते या दशकातील जी सर्वात महत्त्वाची चर्चा आहे, त्यामध्ये सहभागी होण्याची सुवर्णसंधी आम्हाला मिळाली.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here