लॉकडाउनमधील चालकांसाठी आर्थिक ‘होप’

mahindra, hope, corona

मुंबई :
लॉकडाऊनमुळे गेला महिनाभर स्थानबद्ध असलेल्या विविध घटकांना अनेक संस्था, कंपन्या आपापल्यापरीने  सहकार्य करत आहेत. देशातील मालवाहू गाड्यांचे चालकांचेही या काळात काहीच काम नसल्यामुळे हाल झाले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक आधार देण्यासाठी महिंद्रा लॉजिस्टिक्सने ‘होप’ (hope) (हेल्पिंग अवर पीपल ड्युरिंग इमरजन्सीज) हा उपक्रम लाँच केला आहे. त्यासाठी कंपनीने संहिता सोशल व्हेंचर्स या सामाजिक संस्थेशी तसेच यंत्रणेतील लाभार्थींपर्यंत पोहोचण्यासाठी ‘सुपरमनी’ या आर्थिक तंत्रज्ञानविषयक प्लॅटफॉर्मशी भागिदारी केली आहे.

सरकारने जाहीर केलेल्या या लॉकडाउनमुळे तसेच राज्याच्या सीमा बंद असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर चालकांना फटका बसला आहे. मगते देशभरातील विविध राज्यांत मालाची वाहतूक करणारे चालक असो किंवा टॅक्सीचालक किंवा कंपन्यांचे राइड शेयरिंग चालक असोत. यातील बहुतेक चालक अडकून पडले आहेत आणि स्वतःसाठी तसेच कुटुंबियांसाठी पैसे कमावताना त्यांना बऱ्याच अडचणी येत आहेत.
mahindra, hope
या hope उपक्रमाचा एक भाग म्हणून महिंद्रा लॉजिस्टिकने प्रत्येक चालकाच्या खात्यात अत्यावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी 3000 रुपये भरून त्यांना तत्काळ दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय या चालकांना आरोग्य विमा कवच,  सरकारी योजनांचा लाभ आणि खात्रीशीर कर्ज सुविधा दिली जाणार आहे. त्याचबरोबर महिंद्रा लॉजिस्टिकने डिजिटल चॅनेल्सद्वारे आरोग्यसेवा कर्मचाऱ्यांची ग्रस्त कुटुंबांना प्रतिसाद देण्याची क्षमता तसेच पाठिंबा आणखी मजबूत करण्याचा निर्णय घेतला आहे.

 महिंद्रा लॉजिस्टिक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, व्यावसायिक वाहनांपैकी 30 टक्के वाहने देशभरातील रस्त्यांवर अडकून पडलेली असल्यामुळे चालकांना मदतीची नितांत गरज आहे. ट्रक चालक आणि त्यांच्या कुटुंबियांना अन्न आणि इतर मूलभूत सुविधांसाठी रोख पैशांची निकड आहे. आम्ही चालक समाज तसेच आमच्या व्यावसायिक भागिदारांना दिलासा देण्यासाठी hope उपक्रम लाँच केले आहेत. देशातील परिस्थिती मूळपदावर येईपर्यंत या उपक्रमाद्वारे चालक व त्यांच्या कुटुंबियांना लघुकालीन आर्थिक मदत पुरवली जाणार आहे.
mahindra, hope
https://thebusinesstimes.in/mahindra-logistics-appoints-mr-v-s-parthasarathy/

hope उपक्रमाविषयी संहिता सोशल व्हेंचर्सच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रिया नाईक म्हणाल्या, ‘भारतातील कष्टकरी वर्गाला आणि लॉकडाइनमुळे प्रचंड आर्थिक परिणाम सोसत असलेल्या कामगार वर्गाला मदत करण्यासाठी आमच्या इंडिया वर्कर्स अलायन्सतर्फे महिंद्रा लॉजिस्टिक्शी भागिदारी करताना आनंद होत आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी त्यांना मदत करणे आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहाण्यासाठी आधार देणे एवढेच उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. आम्ही सातत्याने आमचे कामगार आणि तज्ज्ञांशी बोलून उपाययोजना कशा जलद, प्रभावी आणि एकंदर परिस्थितीला अनुसरून असतील याची खात्री करत आहोत.’

या सर्वांबरोबरच महिंद्रा लॉजिस्टिक्सने अल्याते या आपल्या एंटरप्राइज मोबिलिटी व्यवसायाद्वारे कोव्हिड- 19चा फटका बसलेल्यांसाठी आपत्कालीन सेवा देण्याचे जाहीर केले आहे. ही मोफत सेवा हैद्राबाद, कोलकाता आणि चेन्नई येथे सुरू असून त्यात रोज नव्या शहरांचा समावेश होत आहे.
https://cinenama.in/2020/04/19/mahesh-babu-confirms-film-with-rajamouli/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here