‘महिंद्रा’ देतेय दिव्यांग आणि माजी सैनिकांना रोजगार

मुंबई :
भारतातील सर्वात मोठी थ्रीपीएल (थर्ड पार्टी लॉजिस्टिक्स) सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा लॉजिस्टिक्स आपल्या कार्यालयांतील वैविध्य व सर्वसमावेशकता मजबूत करण्यासाठीआतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या गुणवत्तेचा लाभ करून घेण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या लोकसंख्येचा वयोगट साजरा करणारी एकीची भावना स्वीकारण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी आखण्यात आलेल्या पंचवार्षिक योजनेचा एक भाग म्हणून कंपनीने विविध प्रकारे दिव्यांग असलेल्या व्यक्तीमाजी सैनिकां रोजगार उपलब्ध करून दिला आहे तसेच लिंगविषमता कमी करण्यासाठी वेगवेगळी पार्श्वभूमी व अनुभव असलेल्या स्त्रियांची नियुक्ती केली जात आहे.
प्राइड मंथच्या सुरुवातीला कंपनीने एलजीबीटीक्यूआयए धोरण या समाजातील लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी दमदार योजना जाहीर केली आहे.

‘या’ बँकेने केले १४ हजारांपेक्षा जास्त इमर्जन्सी क्रेडिट मंजूर

एमएलएलने आपल्या वेयरहाउसेसमधील कामकाजासाठी नुकतीच दिव्यांग व्यक्तींची भरती सुरू केली आहे. कंपनी नोकरभरती आणि त्याविषयी माहिती देण्याचे काम सुरू केले असून आर्थिक वर्ष 2021 मध्ये आपल्या तसेच भागिदारांच्या रोलवर 500 कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे ध्येय कंपनीने ठेवले आहे. त्याशिवाय कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना याविषयी माहिती देणाऱ्या सत्रांचे आयोजन करत असून पीडब्ल्यूडीची भरती करण्यासाठी सुसज्जता आणि आवश्यक पायाभूत सुविधांची तपासणीही कंपनीने नुकतीच पूर्ण केली आहे.
एमएलएल सध्या माजी सैनिकांची – सैन्यदलहवाई दल आणि नौदलाती जेसीओ/एनसीओ भरती करण्याच्या प्रक्रियेत असून ही भरती प्रामुख्याने ग्राहकाच्या कामाच्या ठिकाणी केली जाणार आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यात आपल्या रोलअंतर्गत 10 माजी सैनिकांची भरती करण्याचे ठरवले असून पुढील तीन वर्षांत ही संख्या 50 वर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
लिंगवैविध्यता हे अद्याप लॉजिस्टिक क्षेत्रापुढील आव्हान आहे. ही दरी सांधण्यासाठी या क्षेत्रात पुढाकार घेणाऱ्यांमध्ये महिंद्रा लॉजिस्टिक आघाडीवर असून कंपनीने ‘उडान’ हा करियर करण्याची दुसरी संधी (पुनरागमन) देणारा उपक्रम असून त्यामध्ये सर्व पातळ्यांवरील तसेच सर्व प्रकारचे कामकाज आणि विभागातील स्त्रियांसाठी करियर इंटर्नशीप उपक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. त्याशिवाय स्त्री कर्मचाऱ्यांना मातृत्वाच्या संपूर्म प्रवासात साथ देणारा व योग्य वातावरण पुरवणारा ‘बर्थ अँड बियांड’ हा उपक्रमही तयार करण्याक आला आहे. आतापर्यंत काही स्त्रियांनी ‘बर्थ अँड बियांड’ या उपक्रमाचा लाभ घेतला आहे. कंपनीने उडान उपक्रमाअंतर्गतही स्त्रियांची नोकरभरती सुरू केली असून 2021 पर्यंत ही संख्या 50 वर नेण्याचे उद्दिष्ट आहे.
महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रामप्रवीण स्वामीनाथन म्हणाले, ‘आम्ही आमचे कर्मचारी, व्यावसायिक भागीदार, ग्राहक आणि समाजामधील वैविध्यतेचे मूल्य जाणतो व त्यास प्रोत्साहन देतो. म्हणूनच नवतरुणाईसाठी एमएलएल अधिक आकर्षक करण्यासाठी, स्त्रिया तसेच दिव्यांग व्यक्तींना समान संधी पुरवण्यासाठी, सैन्यदलासारख्या वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या व्यक्तींची भरती करणे आणि एलजीबीटीक्यूआयए कर्मचाऱ्यांविषयी असलेले समज तोडणे महत्त्वाचे आहे. यामुळे आम्हाला वेगवेगळी विचारसरणी आणि ज्ञान प्रवाहाचा अनुभव घेण्याची व पर्यायाने व्यवसायाप्रती आमचा दृष्टीकोन व्यापक करण्याची संधी मिळते.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here