लॉकडाउन शिथिल झाल्याने बाजारात वाढ

मुंबई :
सरकारने लॉकडाउनमध्ये शिथिलता आणण्याची घोषणा केल्यानंतर भारतीय शेअर बाजाराने सलग चौथ्या दिवशी वृद्धीची दिशा कायम ठेवली. निफ्टी २.५७% किंवा २४५.८५ अंकांनी वाढून ९८२६.१५ वर विसावला. तर सेन्सेक्सदेखील अर्थव्यवस्था सुधारण्यासाठीच्या प्रयत्नांमुळे २.७१ टक्के किंवा ८७९.४२ अंकांनी वाढून ३३,३०३.५२ अंकांवर थांबला.
एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की सर्व सेक्टरल निर्देशांक सोमवारी सकारात्मक स्थितीत थांबले. बीएसई स्मॉलकॅप आणि मिडकॅप २ ते ३ टक्क्यांनी वाढले. टॉप बीएसई गेनर्समध्ये आयडीबीआय बँक (१९.९५%), पीईएल (१५.०७%), व्होल्टास (१२.४५%), बजाज फायनान्स (१०.६२%) यांचा समावेश होता. तर, अजंता फार्मा (४.६४%), बायर क्रॉप सायन्सेस लिमिटेड (४.१३%), पेट्रोनेट एलएनजी (३.३५%), डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज (२.९२%) आणि आयसीआयसीआय प्रुडेंन्शिअल लाइफ इन्शुरन्स (२.५३%) हे बीएसईतील टॉप लूझर्स ठरले.

‘हे’ ‘हॉट’ स्मार्टफोन आहेत १० हजाराच्या आत

देशांतर्गत इक्विटी बाजारात खरेदी झाल्यामुळे भारतीय रुपयाच्या नफ्यात आज इंट्राडेमध्ये घट झाली. परंतु चलनाने दिवस बंद होताना ७५.४५ रुपये प्रति डॉलरची वृद्धी केली.
भारताने लॉकडाउनच्या पाचव्या टप्प्यात प्रवेश करताना देशातील सर्वात मोठी करा उत्पादक, मारुती सुझूकीने मे महिन्यात १३,८६५ देशांतर्गत विक्री नोंदवली. या कंपनीच्या शेअरने २.६२ टक्क्यांची वाढ दर्शवून ५७५८ रुपयांवर व्यापार केला.
अदानी पॉवरने आपले शेअर्स एक्सचेंजमधून काढून टाकण्याचा विचार प्रकट केल्यानंतर शेअरने ९.२०% ची वाढ दर्शवली. जो शेअर बीएसईवर ७.४ टक्के किंवा २.६५ रुपयांची वाढ घेऊन ३९ रुपयांनी व्यापार करत होता. तो इंट्राडेवर ४० रुपयांनी सुरू झाला. तथापि, तो अखेरीस ३९.७५ रुपयांवर बंद झाला.

जागतिक भावना सकारात्मक:
काही निर्बंध ठेवून बहुतांश अर्थव्यवस्था पुन्हा सुरु होत असल्याने जागतिक बाजारातही आज सकारात्मक प्रतिसाद दिसला. भारतीय शेअर बाजार जागतिक बाजाराशी संलग्न असल्याने येथेही सकारात्मक चित्र दिसून आले. प्रमुख बाजार निर्देशांकांनी सकारात्मक कल दर्शवला तर बँकिंग निर्देशांकाना बाजाराचे नेतृत्व केले. निक्केई २२५ चे शेअर्स ०.८१%, हँग सेंग ३.३६% आणि एफटीएसई एमआयबी हे १.०० टक्क्यांनी वाढले.

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here