आरबीआयच्या सवलतीमुळे बाजारावर पुन्हा दबाव

rbi

मुंबई :
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मुदतकर्जाच्या परतफेडीची मुदत आणखी वाढवण्याचा निर्णय घेतल्याने आजचा भारतीय शेअर बाजार नकारात्मक स्थितीत बंद झाला. देशातील किरकोळ कर्जधारकांना दिलासा देण्यासाठी ही आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. भारतातील वित्तीय क्षेत्राच्या दृष्टीने हा निर्णय नकारात्मक दिसल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झाल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. या निर्णयासोबतच आरबीआयने ४० बेसिस पॉइंट अर्थात ४ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला.
एसअँडपी बीएसई सेन्सेक्स शुक्रवारी २६० अंक किंवा ०.८४% ची घसरण होऊन ३०,६७२.५९ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५० इंडेक्सनेही आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ६७ अंकांची म्हणजेच ०.७४ टक्क्यांची घट दर्शवून तो ९,०३९.२५ अंकांवर बंद झाला. दलाल स्ट्रीटवरील मार्केटमधील मागील तीन दिवसांची बढत आज थांबलेली दिसली.
बाजारात १८ ते ३० सेन्सेक्स शेअर्सनी लाल दिवा दर्शवला. व्यापक बाजारात एसअँड पी बीएसी मिडकॅप सूची ०.८३ टक्क्यांनी घसरून ११,२७० वर पोहोचली. तर एसअँडपी बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स ०.२३ टक्क्यांनी घसरून १०,५२४ अंकांवर पोहोचली.

‘या’ विमा योजनेतील २७६ कोटीचे दावे मान्य
rbi
आरबीआयच्या निर्णयानंतर दबावाखाली असलेल्या निफ्टी बँकेने ४५६ अंक म्हणजेच तिच्या मूल्याच्या २,५७ टक्के मूल्य गमावले. ती १७,२७८.९० अंकांवर बंद झाली. तर बीएसई मिडकॅपमध्ये ०.८३ टक्क्यांची घट दिसून आली.
टॉप लूझर्समध्ये अॅक्सिस बँक (५.३२%), एचडीएफसी (५.०३%) आणि बजाज फिन (४.५०%) यांचा समावेश आहे. तर टॉप गेनर्समध्ये एमअँडएम (४.३०%), इन्फोसिस (२.९८%) आणि एशियन पेंट्स (२.६०%) हे सहभागी होते.
बँकिंग स्टॉक्सपैकी एसबीआय कार्ड्सने आरबीआयच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये कर्ज परतफेडीच्या मोरॅटोरिअममध्ये ३ महिन्यांची वाढ देण्याची घोषणा झालेल्यानंतर ४९५ रुपयांची घसरण घेतली. हा स्टॉक ५१० रुपये म्हणजेच ६ टक्क्यांनी घसरला.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here