आता मिळणार कोविड-19 पासून ‘मॅक्स’ सुरक्षा

max life

नवी दिल्ली :
मॅक्स लाइफ (max life) इन्शुरन्स कंपनी लिमिटेडने आज “मॅक्स लाइफ कोव्हिड-१९ वन इयर टर्म रायडर” (कोव्हिड-१९ रायडर) या नॉन-लिंक्ड नॉन-पार्टिसिपेटिंग इंडिव्हिज्युअल प्युअर रिस्क प्रीमिअम लाइफ इन्शुरन्स रायडरचा शुभारंभ केला. १ लाख रुपयांच्या हमी रकमेसाठी २७१ रुपये इतक्या किफायतशीर वार्षिक प्रीमिअमपासून सुरुवात होणाऱ्या या कोव्हिड-१९ रायडरमुळे सध्या सुरू असलेल्या साथीपासून संरक्षण हवे असणाऱ्या ग्राहकांना उत्तम पर्याय उपलब्ध होणार आहे. मॅक्स लाइफच्या सध्या उपलब्ध असलेल्या मुदत विमा, बचत, उत्पन्न ते निवृत्तीपश्चात लाभ विमा योजनेपर्यंतच्या १२ विविध योजनांशी या रायडरची सांगड घालता येणार आहे.
सध्याच्या साथीच्या आजारामुळे करोना विषाणूची बाधा होऊन येणारे आजारपण अथवा या आजाराने अकाली मृत्यू ओढवल्यास भेडसावणाऱ्या आर्थिक अडचणीपासून स्वत:चे व आपल्या कुटुंबियांचे संरक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘मॅक्स लाइफ इंडिया प्रोटेक्शन कोशंट-एक्स्प्रेस’ या कंतारच्या सहयोगाने अलिकडेच झालेल्या सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावात झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुदत विमा खरेदी करू, असे ४१ टक्के प्रतिसादकर्त्यांनी सांगितले आहे. याखेरीज, कोव्हिड-१९चा फटका आपल्यालाही बसू शकतो, ही जाणीव झाल्यावर मेट्रोमधील ३१ टक्के आणि शहरांमधील २० टक्के प्रतिसादकर्त्यांनी कोव्हिड-१९/क्रिटिकल इलनेस रायडरसह आयुर्विमा खरेदी केल्याचे सांगितले. या सर्वेक्षणातून पुढे आलेल्या निष्कर्षांचा विचार करून आणण्यात आलेल्या या कोव्हिड-१९ रायडरच्या माध्यमातून मॅक्स लाइफ आपल्या ग्राहकांना आयुष्यातील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी गुंतवणूक करणे सुरू ठेवून त्यांचे आर्थिक भवितव्य सुरक्षित करतानाच त्यांच्या मूळ विमा योजनेशी वन इयर रायडर संलग्न करून त्यांचे वर्तमान व निकटचे भविष्य सुरक्षित करण्यास मदत करत आहे.
आता आले ‘नीम तुलसी’चे कपडे…
max life
कोव्हिड-१९ रायडरच्या शुभारंभाबाबत मॅक्स लाइफ इन्शुरन्सचे उपव्यवस्थापकीय संचालक व्ही. विश्वानंद म्हणाले, “सध्याच्या साथीच्या आजारपणामुळे आपल्या आयुष्यात विविध प्रकारच्या आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत. नजीकच्या भविष्यात कदाचित ही साथ संपुष्टात येईलही, पण आयुष्य त्यापुढेही सुरू राहाणार आहे. या कोव्हिड-१९ रायडरच्या माध्यमातून कोव्हिड-१९ मुळे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींवर मात करतानाच त्यांचे व त्यांच्या प्रियजनांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी त्यांना मदत व्हावी, यासाठी आम्ही आमच्या ग्राहकांचे भागिदार होऊ इच्छितो. मुदत विम्यापासून बचत योजनांपर्यंतच्या मूळ योजनेला संलग्न अशा रायडरच्या माध्यमातून एक वर्षापर्यंत आमच्या ग्राहकांचे संरक्षण करणे, हे या रायडरचे उद्दिष्ट असून यामुळे उज्ज्वल भविष्याचे नियोजन करतानाच वर्तमानात आवश्यक असलेले संरक्षण त्यांना मिळणार आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here