‘माझगाव डॉक’चा आयपीओ २९ पासून…

मुंबई :
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही भारत सरकारच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीला मिनी रत्न श्रेणीने पुरस्कृत करण्यात आले आहे. भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पारंपरिक पाणबुड्यांची बांधणी केवळ याच भारतीय जहाजबांधणी कंपनीने केली आहे. या कंपनीतर्फे प्राथमिक समभाग विक्री (इनिशिअल पब्लिक ऑफरिंग) २९ सप्टेंबर २०२० रोजी सुरू करण्यात आलेला आहे आणि १ ऑक्टोबर २०२० रोजी ही विक्री बंद होणार आहे. प्रत्येक समभागाची किंमत Rs.१३५ ते Rs.१४५ या दरम्यान असणार आहे.
सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (नियमन) नियम १९(२)(ब)१९५७ आणि सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (इश्यु ऑफ कॅपिटल अँड डिसक्लोजर रिक्वायरमेंट) नियम२०१८ च्या सुधारित नियम ३१ ला अनुसरून असलेल्या बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून ही ऑफर करण्यात आली आहेजिथे क्यूआयबी (क्वालिफाइड इन्स्टिट्युशनल बायर्स) नेट ऑफरच्या ५०%हून अधिक नाहीनॉन-इन्स्टिट्युशनल बिडर्स नेट ऑफरच्या किमान १५% आहेत आणि रिटेल इंडिव्हिज्युअल बिडर्स नेट ऑफरच्या किमान ३५% आहेत.

आमच्या कंपनीच्या १५.१७% प्रि-ऑफर पेड अप इक्विटी शेअर कॅपिटलची शेअरहोल्डरना विक्री करून ३०,५९९,०१७ इक्विटी शेअर्सची निर्गुंतवणुक करणे हा या ऑफरचा हेतू आहे. या इश्युमधून जमा होणारा निधी भारत सरकारच्या (विक्री करणारा शेअरहोल्डर) संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून काम करणाऱ्या राष्ट्रपतींकडे जाईल. येस सिक्युरिटीज इंडिया लिमिडेटअॅक्सिस कॅपिटल लिमिटेडएडलवाइज फायनान्शिअल सर्व्हिसेस लिमिटेडडॅम कॅपिटल अॅडव्हायजर्स लिमिटेड (पूर्वीचे आयडीएफसी सिक्युरिटीज लिमिडेड) आणि जेएम फायनान्शिअल्स लिमिटेड हे या ऑफरसाठी बीआरएलएम आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here