‘मेरिटनेशन’च्या लाईव्ह क्लासला आठपट प्रतिसाद

मुंबई :
कोविड-19 च्या लॉकडाऊनमध्ये भारतातील एडटेक क्षेत्राच्या वाढीला चालना मिळाली आहे. आकाश एज्युटेक प्रा. लि.ची उपकंपनी असलेल्या मेरिटनेशनने आपल्या मंचावर लाईव्ह क्लास वापरांच्या मिनिटांमध्ये जून 2020 रोजी संपलेल्या तिमाहीत तब्बल आठ पट वाढ अनुभवली आहे. के12 विद्यार्थ्यांसाठीच्या मेरिटनेशन व्यासपीठावरील प्रश्नपत्रिका सरावामध्येही या व्यासपीठाने पाच पट वाढ झाल्याचे सांगितले. 
मार्च 2020 रोजी संपलेल्या तिमाहीच्या तुलनेत जून 2020 रोजी संपलेल्या तिमाहीतील वाढीची टक्केवारी मोजण्यात आली आहे. उपलब्ध माहितीनुसार वापरल्या गेलेल्या लाईव्ह मिनिटांमधील 85 टक्के मिनिटे विज्ञान आणि गणित या विषयांसाठी वापरली गेली. तर, यात सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा लाईव्ह क्लासेसचा वापर 70 टक्के होता.
मेरिटनेशनच्या लाइव्ह क्लासेसचा सर्वाधिक वापर करणाऱ्या राज्यांमध्ये बिहार आणि झारखंड (13 पट) या राज्यांचा समावेश आहे. त्या खालोखाल आंध्र प्रदेश (10 पट), आसाम आणि त्रिपुरा (9 पट), राजस्थान (9 पट) आणि उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि कर्नाटक (8 पट) या राज्यांचा क्रमांक आहे. एडटेकमधील या प्रमुख कंपनीने भारताबाहेर मध्य पूर्वेतही 10 पट वाढ अनुभवली आहे.

‘फ्लिपकार्ट’चे ‘2GUD’ पाऊल

आकाश एज्युटेक प्रा. लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी नरसिंह जयकुमार यांनी याबद्दल सांगितले कि, ‘कोविड-19 च्या संकटामुळे अभ्यासात जो खंड पडला त्यामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी व्हर्च्युअल शिक्षणाचा अंगिकार करत आहेत. दररोज विद्यार्थ्यांच्या संख्येत जी वाढ होत आहे त्यातून हे स्पष्ट होते की आम्ही देऊ केलेल्या शिक्षणाचा आणि अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे. घरातील सुरक्षित वातावरणात राहून अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वतोपरी साह्य करण्यासाठी आम्ही सातत्याने नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम आणि नवे कोर्सेस उपलब्ध करून देऊ.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here