मेटल आणि वाहन क्षेत्रामुळे ‘बाजार’ तेजीत

market

मुंबई :
गुरुवारी (share market) सेन्सेक्स तब्बल ९९७ अंकांची उडी घेत ३.०५ टक्के उंचीवर ३३,७१७ अंकांवर बंद झाला. निफ्टी ५०नेही दिवसभराच्या बाजारात ३.२१ टक्क्यांची म्हणजेच १४० अंकांची वाढ घेत १०,००० अंकांवर बंद झाला. मेटल आणि वाहन क्षेत्राने शेअर बाजारातील (share market) नफ्याचे नेतृत्व केल्याचे एंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले.
ब्ल्यूचिप स्टॉकमध्ये टाटा मोटर्सने आज निफ्टीमध्ये १९.३१ टक्क्यांची वाढ घेतली. त्यानंतर युनायटेड फॉस्फरसने १६.४९ टक्के, ओएनजीसीने १३.३३ टक्के तसेच वेदांताने १३.१४ टक्क्यांची वृद्धी नोंदवली. निफ्टीने ४३ स्टॉकमध्ये प्रगती दर्शवली तर ७ स्टाॅक घसरले. आजच्या लूझर्समध्ये सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, सिपला आणि इंडसइंड बँकेसह इतरांचा समावेश होता. बीएसईच्या ३०-स्टॉक बेंचमार्क इन्डेक्समध्ये ओएनजीसीने लाभार्थ्यांचे नेतृत्व केले. त्यानंतर एचसीएल टेक्नोलॉजीने १०.४४ टक्के, हिरो मोटोकॉर्ने ९.९४ टक्के आणि टीसीएस व मारुती सुझुकीने प्रत्येकी ५.७६ टक्क्यांची बढत घेतली. बीएसई मेटल इंडेक्समधील सर्व मेटल स्टॉक्सने तसेच निफ्टी ऑटोतील सर्व १६ स्टॉक्सनी वृद्धी दर्शवली.
सेन्सेक्स, निफ्टी सलग दुस-या दिवशी तेजीत

market
ग्लोबल Marketमध्येही दिसली वाढ:

आज भारतीय स्टॉक एक्सचेंजमधील (share market) वाढीचे श्रेय अनेक सकारात्मक घटकांना द्यावे लागेल. त्यातील प्रमुख कारण म्हणजे कोरोना व्हायरसच्या केसेस कमी होत आहेत आणि त्यानंतरच्या थोडी विश्रांतीची आशा दिसत आहे. भारतातच ३०० कोव्हिड मुक्त जिल्व्हे असून इतर ३०० जिल्ह्यांमध्ये खूप कमी रुग्ण आहेत. भारत ४ मे नंतर हळू हळू लॉकडाउनच्या बाहेर येऊ लागेल. त्याचबरोबर एफअँड ओच्या समाप्तीने मार्केटला आणखी वेग मिळाला. मल्टिपल एशियन स्टॉक्सनीही ७ आठवड्यातील उच्चांकाला स्पर्श करुन वेगात भर पाडली. गुंतवणूकदारदेखील चीनच्या पीएमआय डेटामुळे खुश आहेत. मार्चमध्ये ५२ अंकांवरून ५०.२ अंकांवर घट होऊनही उत्पादनाच्या क्षेत्रात दुसऱ्या महिन्यात विस्ताराची नोंद दिसली.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here