२० लाख कोटींचे ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेज

नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा करत २० लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली. देशाच्या सकल उत्पन्नाच्या १० टक्के रकमेचं पॅकेज सरकार जाहीर करत असल्याचं मोदी म्हणाले. नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी या पॅकेजची घोषणा केली.
आतापर्यंत जाहीर करण्यात आलेली आर्थिक मदत आणि हे पॅकेज एकत्र मिळून २० लाख कोटींचं आहे. २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेलं हे २० कोटींचं पॅकेज भारताच्या स्वावलंबी योजनेला नवी गती देईल.  हे पॅकेज जीडीपीच्या १० टक्के असल्याचंही नरेंद्र मोदींनी यावेळी सांगितलं. सर्व प्रकारच्या उद्योगांना चालना देण्यासाठी हे पॅकेज आहे. देशांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी, मजुरांसाठी तसेच प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी पॅकेज आहे असं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. पॅकेजद्वारे आर्थिक व्यवस्था मजबूत करण्यात येईल. अर्थमंत्री यांच्याकडून स्वावलंबी भारत अभियानाची विस्तृत माहिती दिली जाईल असं मोदी यांनी यावेळी नमूद केले. 

2 ते 3 दिवसांत मिळणार नवीन पॅकेज

यावेळी स्वावलंबी भारताचे पाच प्रमुख स्तंभ असल्याचं मोदी म्हणाले. ‘स्वावलंबी भारत घडवण्यासाठी अर्थव्यवस्था, पायाभूत सोयीसुविधा, यंत्रणा, लोकसंख्याशास्त्र, मागणी यावर लक्ष केंद्रीत करावं लागेल. स्वावलंबी भारताचं स्वप्न साकारण्यासाठी अर्थव्यवस्थेला चालना देण्याची गरज आहे. पायाभूत सोयीसुविधांना बकळटी द्यावी लागेल. स्वावलंबी भारतासाठी यंत्रणेत बदल करावे लागतील. ती अधिकाधिक तंत्रज्ञानस्नेही असायला हवी. लोकसंख्याशास्त्र आपलं सामर्थ्य आहे. तिचा पुरेपूर वापर करायला हवा. भारतीय बाजारातील मागणी हीदेखील आपली जमेची बाजू आहे. मागणी आणि पुरवठा साखळीतले सगळे घटक सशक्त करायला हवेत. त्यांचा पूर्ण क्षमतेनं वापर करण्याची गरज आहे,’ असं मोदी म्हणाले.
दरम्यान, १८ मे लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरु होणार असल्यावरही मोदींनी यावेळी शिक्कामोर्तब केले. 

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here