मनीग्राम आणि फेडरल बँकेमध्ये भागीदारी

मुंबई : 
मनीग्राम पेमेण्‍ट सिस्टिम्‍स या पीटूपी पेमेण्‍ट्स व पैसे हस्‍तांतरण सुविधा देणाऱ्या कंपनीने आज दि फेडरल बँकेसोबत सहयोग जोडल्‍याची घोषणा केली. हा धोरणात्‍मक सहयोग भारतातील ग्राहकांना किफायतशीर बँक खाते क्रेडिट सुविधा देणार आहे. या माध्‍यमातून लाखो ग्राहकांना थेट त्‍यांच्‍या बँक खात्‍यांमध्‍ये ठेवी रक्‍कम मिळणार आहे, ज्‍यासाठी त्‍यांना घराबाहेर पडण्‍याची गरज नाही, जे सद्यस्थितीमध्‍ये आवश्‍यक आहे. 
‘फेडरल बँक भारतभरात आर्थिक सेवांच्‍या डिजिटलीकरणामध्‍ये अग्रणी म्‍हणून ओळखली जाते. आम्‍हाला लाखो लोकांना थेट त्‍यांच्‍या बँक खात्‍यांमध्‍ये पैसे प्राप्‍त होण्‍याची सुविधा देण्‍यासाठी त्‍यांच्‍यासोबत सहयोग जोडण्‍याचा अभिमान वाटत आहे,’ असे मनीग्रामचे मुख्‍य महसूल अधिकारी ग्रॅण्‍ट लाइन्‍स म्‍हणाले. ‘हा सहयोग विशेषत: सध्‍या सुरू असलेल्‍या कोविड-१९ महामारीदरम्‍यान महत्त्वाचा आहे. या सहयोगामुळे कुटुंबांना त्‍यांच्‍या घरीच राहून  पैसे मिळू शकतील.’

फेडरल बँकेचेही एटीएम ग्राहकांच्या दारी

वर्ल्‍ड बँकेच्‍या मते भारत जगातील सर्वात मोठा रेमिटन्‍सेस प्राप्‍त करणारा देश आहे. असा अंदाज आहे की, भारताने २०१९ मध्‍ये रेमिटन्‍सेसमधून ८२ बिलियन अमेरिकन डॉलर्सहून अधिक रक्‍कम प्राप्‍त केली आहे. फेडरल बँकेचा भारतातील रेमिटन्‍स बाजारपेठेमध्‍ये १५ टक्‍क्‍यांहून अधिक बाजारपेठ हिस्‍सा आहे. मनीग्रामसोबत सहयोग या व्‍यवसायाला अधिक चालना देण्‍याची अपेक्षा आहे. 
”आम्‍हाला मनीग्रामसोबत आमचा रूपी रेमिटन्‍स सहयोग घोषित करताना आनंद होत आहे. अनिवासी भारतीय आता भारतामध्‍ये पैसे हस्‍तांतरण करण्‍याच्‍या आधुनिक, कमी खर्चिक, जलद, सुलभ व अधिक विश्‍वसनीय मार्गाचा आनंद घेऊ शकतील. फेडरल बँकमध्‍ये आमचा ”मानवाला प्राधान्‍य देण्‍यासोबत डिजिटलला अग्रस्‍थान’ यावर विश्‍वास आहे. मनीग्रामसोबत सहयोग हा बँकेने उच्‍च दर्जाचा ग्राहक अनुभव देण्‍यासाठी कशाप्रकारे नाविन्‍यपूर्ण तंत्रज्ञानाचा उपयोग केला आहे, याचे आणखी एक उत्तम उदारहण आहे. रेमिटन्‍स व नॉन-रेसिडण्‍ट क्षेत्रामध्‍ये अग्रणी कंपनी असल्‍यामुळे आम्‍हाला विश्‍वास आहे की, मनीग्रामसोबतचा हा सहयोग ग्राहकांना प्रचंड लाभ देईल,” असे फेडरल बँकेच्‍या कार्यकारी संचालिका शालिनी वॉरियर म्‍हणाल्‍या. 
ताज्या बातम्यांसाठी इथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here