सुजय दास उचलणार ‘मनीटॅप’ची जोखीम

मुंबई:
अॅप आधारीत ग्राहक क्रेडिट लाइन कंपनी मनीटॅपने सुजय दास यांची मुख्य जोखीम अधिकारीपदी नेमणूक केली आहे. कर्ज आणि वित्तीय क्षेत्रातील दिग्गज असलेल्या सुजय यांना जोखीम व्यवस्थापन, विश्लेषण आणि क्रेडिट पॉलिसीमध्ये विविध भौगोलिक क्षेत्रातील विविध वित्तीय संस्थांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. अनेक संस्थांमध्ये त्यांनी सर्वोत्कृष्ट जोखीम व्यवस्थापन संघ तयार केले आहेत.
कोव्हिडनंतरच्या अर्थव्यवस्थेत, मनीटॅपमध्ये नावीन्यपूर्ण क्रेडिट पॉलिसी आणि धोरणे आखण्यासाठी सुजय यांचे डेटा विज्ञान आणि सांख्यिकी मॉडेलिंगद्वारे समर्थित कौशल्य प्रमुख भूमिका बजावेल. यापूर्वी त्यांनी बजाज फिनसर्व्ह लिमिटेड येथे प्रमुख जोखीम विश्लेषक म्हणून काम पाहिले आहे.

इंजिनिअरिंग पदवीधरांवर बेकारीची तलवार

मनीटॅपचे सह संस्थापक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी कुणाल वर्मा यांनी सांगितले की, ‘आमच्या यशकथेच्या महत्त्वाच्या काळात सुजय यांना मंडळात आणल्यामुळे आम्हाला आनंद झाला आहे. सुजय यांनी जोखीम व्यवस्थापन आणि विश्लेषणाचे सखोल ज्ञान त्यांनी समोर आणले. आमच्या जोखीम धोरणांमध्ये योग्य चेक आणि बॅलेन्सेस राखण्यासाठी आम्हाला त्यांचे उत्कृष्ट मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. आमच्या मजबूत क्रेडिट शिस्तीची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांची मदत खूप महत्त्वाची ठरेल.’
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here