मातृदिनी ‘जॉन्सन’ची हृदयस्पर्शी फिल्म

मुंबई :
बेबी केयर ब्रँड जॉन्सनने सध्याच्या अनिश्चित वातावरणातही आईपणाचा आनंद आणि प्रवास दर्शवणारा नवा डिजिटल व्हिडिओ आज सादर केला. आपलं बाळ आणि कुटुंबियांची काळजी घेणाऱ्या देशातील प्रत्येक आईसाठी जॉन्सनने मातृदिनाच्या निमित्ताने ‘यू आर डुइंग ओके, मॉम’ हा संदेश दिला आहे.
या नव्या व्हिडिओबद्दल जॉन्सन अँड जॉन्सन कन्झ्युमर डिव्हिजन, इंडियाच्या विपणन उपाध्यक्ष मनोज गाडगीळ म्हणाले. ‘जॉन्सन गेल्या बऱ्याच वर्षांपासून आयांच्या कित्येक पिढ्यांचा साथीदार असून सध्याच्या परिस्थितीत त्यांच्या मनात बाळाची योग्य काळजी घेण्याबद्दल अनिश्चितता आणि चिंता दाटलेली असू शकते. मातृदिनाच्या निमित्ताने आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक आईचे कौतुक करत असून त्यांच्या बाळाबरोबरच्या नात्याची दृढता याच अधोरेखित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे त्या सगळं छान हाताळत असल्याचा दिलासाही आम्ही यातून देत आहोत.’
या फिल्मध्ये आई आणि तिच्या बाळामधले काही हळवे क्षण दाखवण्यात आले असून ही फिल्म युट्यूबवरील बेस्ट फॉर बेबी चॅनेलvideo,
तसेच फेसबुकवर(@johnsonsbabyindia)
Instagram (@johnsonbabyindia) लाँच करण्यात आली आहे.
व्हिडिओ इथे पहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here