लोणचं, तुम्हांला जसं हवं तसं…

मुंबई :
आपल्या देशात असा एकही कोपरा आढळणार नाही, जिथे लोणचे तयार करण्याची परंपरा नसेल. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आपल्या घरगुती लोणच्याशी संबंधी आठवणी नक्कीच असतात. मग आजीच्या हातची चव असो किंवा घराच्या गच्चीवर लोणच्याच्या बरणीत मुरत घातलेला आनंद असो.. प्रत्येक व्यक्तीच्या लोणच्याशी संबंधी निरनिराळ्या आठवणी असतात. मदर्स रेसिपी पिकल्स यांच्या कॅम्पेनच्या निमित्ताने घराघरात लोणच्याच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळणार आहे.
घरात निरनिराळी लोणची तयार करण्याची प्रक्रिया म्हणजे एक वार्षिक उत्सवच असतो. बाजारातून चांगल्या प्रतीची फळं निवडण्यापासून ते पारंपरीक पाककृतीनुसार मसाल्यांचे योग्य प्रमाण मिसळण्यापर्यंत किंवा नियमित लोणच्याला उन्हं दाखवण्याच्या प्रक्रियेत कुटुंबातील बऱ्याच सदस्यांचा समावेश असतो. आंबट कैऱ्या, चटकदार लिंबू आणि मिरची हे लोणच्याचे काही सर्वाधिक लोकप्रिय प्रकार मानले जातात. लोणचे तयार करण्याचा सराव म्हणजे भावनिक आणि शारिरीक पातळ्यांवरील एक प्रवासच असतो! आजच्या काळात आपण सगळेच घडाळ्याच्या काट्यावर पळत आहोत. प्रत्येकाचे जीवन धकाधकीचे झाले असताना तयार उत्पादनांवर विसंबून राहण्याचे प्रमाण वाढलेले दिसते. मात्र चव आणि दर्जाबाबत कोणतीच तडजोड चालत नाही. ग्राहकांचे काम हलके करणे आणि त्यांना जुन्या पारंपरीक चवीशी मिळताजुळता स्वाद उपलब्ध करून देणे हे या कॅम्पेनचे उद्दिष्ट आहे.  

‘हार्टफुलनेस’चा करुणामय योगा 

या कॅम्पेनविषयी बोलताना मदर्स रेसिपी – देसाई फुड्सच्या कार्यकारी संचालिका संजना देसाई म्हणाल्या की, “आम्ही ‘युअर ट्रेडीशन्स अवर पिकल्स’ या कॅम्पेनची सुरुवात केली आहे. स्वयंपाकाशी संबंधित आमच्या परंपरेला विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका नाही हा विचार डोक्यात आला तिथेच कॅम्पेनची कल्पना सुचली. तर मग यंदाच्या उन्हाळ्यात आपण स्वादाच्या परंपरेत खंड तरी कशासाठी पाडायचा? आमच्या प्रत्येक कॅम्पेनसोबत ग्राहकांच्या भावनांची तार छेडण्याचा तसेच त्यांना आठवणींच्या खजिन्याकडे नेण्याचा प्रयत्न असतो. आमच्याकडे प्रत्येक चवीसाठी 50 हून अधिक लोणच्यांचे प्रकार उपलब्ध आहेत. आम्ही कोणतेही कृत्रिम प्रिझरवेटिव्स, कृत्रिम रंग वापरत नाही. मोठ्या प्रेमाने पारंपरिक पद्धतीने लोणचे तयार करतो. त्यामुळे 
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here