‘माय टॉकिंग टॉम’ आला ‘मित्रां’सोबत… 

मुंबई :
आऊटफिट७ ने My Talking Tom Friends हा एक नवीन व्‍हर्च्‍युअल पेट गेम सादर केला आहे. पुरस्‍कार-प्राप्‍त बोलत टॉम आणि मित्र फ्रँचायजीचा हा बहुप्रतिक्षित नवीन गेम प्‍ले-अॅज-यू-वॉण्‍ट सँडबॉक्‍स अनुभवामध्‍ये सर्व सहा आयकॉनिक पात्रांना एकत्र आणले आहे. या गेमसाठी १.३ कोटींहून अधिक गेमर्सने प्री-रजिस्‍ट्रेशन्‍सची नोंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
आऊटफिट७ चे सीईओ झिनियु कियान म्‍हणाले, ”My Talking Tom Friends सह आमचा लोकप्रि‍य व्‍हर्च्‍युअल पेट गेम शैलीला नवीन स्‍तरावर घेऊन जात त्‍यामध्‍ये नवीन सुधारणा करण्‍याचा मनसुबा होता. आमची दूरपर्यंत जात लोकांचे लक्ष वेधून घेणारी कामगिरी करण्‍याची इच्‍छा होती.”
”पहिल्‍यांदाच आम्‍ही अशा वातावरणाची निर्मिती केली, जेथे आमचे चाहते एकाच वेळी एक नव्‍हे तर, अनेक पात्रांसोबत त्‍यांच्‍या निवडीप्रमाणे खेळू शकतात. यामधून व्‍यावहारिकदृष्‍ट्या अनेक संधी दिल्‍या जातात, ज्‍यामधून प्रत्‍येक युजरला खेळाचा अद्वितीय अनुभव मिळतो. आमचे चाहते या नवीन गेमचा कशाप्रकारे अनुभव घेतील, हे जाणून घेण्‍यासाठी आम्‍ही खूपच उत्‍सुक आहोत.”
आता मिळणार ‘ड्रोन’लाही विमा संरक्षण

टॉकिंग टॉम, टॉकिंग एंजेला, टॉकिंग हंक, टॉकिंग बेन व टॉकिंग जिंजर या फ्रँचायजीमध्‍ये टॉकिंग बेक्‍का या नवीन पात्राची भर करण्‍यात आली आहे. ज्‍यामुळे खेळाडू आता एकाच वेळी सहा पात्रांच्‍या गरजा व इच्‍छा पूर्ण करण्‍यासाठी आणि त्‍यांना त्‍यांच्‍या काल्‍पनिक जीवनांमध्‍ये जगण्‍यासाठी मदत करू शकतात.
हे सर्व मित्र डायनॅमिक आहेत. ते मोकळ्या, स्‍क्रॉलेबल घराभोवती गिरक्‍या घालतात आणि धमालपूर्ण मौजमजेसाठी नवनवीन मार्ग शोधतात. खेळाडू त्‍यांच्‍याशी संलग्‍न होऊन कूकिंग, पेन्टिंग, बागकाम व सामाजिक कार्य अशा मजेशीर कृतींमध्‍ये सहभाग घेऊ शकतात. तसेच नवीन, अॅक्‍शनने भरलेले मिनी-गेम्‍स देखील आहेत. प्रभावी परस्‍परसंवादी पर्याय चाहत्‍यांना त्‍यांच्‍या इच्‍छेनुसार वैविध्‍यपूर्ण व सुंदररित्‍या डिझाइन केलेल्‍या व्‍हर्च्‍युअल विश्‍वाचा शोध घेण्‍याची आणि त्‍या विश्‍वाला सानुकूल करण्‍याची सुविधा देतात.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here