मुंबई :
नवनीतच्यावतीने युवा ब्रॅण्ड अंतर्गत सेडर पेन्सिल नुकतीच बाजारात आणली. उत्कृष्ट दर्जाच्या, वजनाने हलक्या आणि मंद सुवास असलेल्या देवदार वृक्षाच्या लाकडापासून पेन्सिलसारखे साधे पण वेगळा आयाम असलेले उत्पादन तयार करण्यात आले आहे.
युवाच्या सेडर पेन्सिल्स पर्यावरणाला कोणतीही हानी न पोहोचू देता अव्वल दर्जाच्या लाकडापासून तयार केलेल्या आहेत. नैसर्गिक लाकडाच्या स्पर्शामुळे या पेन्सिलवर घट्ट पकड ठेवता येते. पेन्सिलचे स्वरूप आणि स्पर्श दोन्ही अत्यंत नैसर्गिक आहेत. लीड पूर्णपणे बांधलेले असल्यामुळे लिहिताना अतिरिक्त दाब दिला गेल्यास किंवा पेन्सिल अचानक पडली तरीही लीड तुटत नाही. पेन्सिलला कोणत्याही स्प्लिंटरशिवाय टोक करता येते. तिच्या षटकोनी आकारामुळे आरामदायी पकड मिळते. पेन्सिल वजनाने कमी असल्यामुळे दीर्घकाळ लिहितानाही दाब येत नाही. सेडर पेन्सिल्स दोन प्रकारांत उपलब्ध आहेत: नियमित पेन्सिल्स आणि इरेझर टिपसह पेन्सिल्स. नियमित पेन्सिलचा पॅक शार्पनर आणि इरेझरसह आहे. १० पेन्सिल्सचा पॅक १०० रुपयांना उपलब्ध आहे. या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वांत किफायतशीर दराच्या पेन्सिल्स आहेत.
युवाचे मुख्य धोरण अधिकारी आणि प्रवक्ते अभिजित सन्याल सेडर पेन्सिल्सच्या लाँचबद्दल म्हणाले, सेडर पेन्सिल्स हे एक सुविधांनी युक्त असे उत्पादन आहे आणि अत्यंत विकसित अशा नवीन पिढीला आकर्षित करून घेणार आहेत. या उत्कृष्ट पेन्सिल्स त्यांच्या नैसर्गिक सौंदर्य आणि सुवासासाठी ओळखल्या जातील. नैसर्गिक लाकडी स्पर्शामुळे लिहिताना तिची पकड घट्ट आहे आणि तिचा नैसर्गिक सुगंध तुमच्या कामाची मजा वाढवेल. या पेन्सिल्स खिशाला परवडण्याजोग्या आहेत आणि आम्ही जे मूल्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ते मूल्य ग्राहकांपर्यंत पोहोचेल, अशी आशा आम्हाला आहे.