‘नीलकमल’ने आणले क्वारंटाईनपूरक बेड 

मुंबई :
प्रसिद्ध फर्निचर ब्रॅण्‍ड नीलकमलने कोविड फर्निचर नव्याने बाजारात आणले असून, यामध्ये क्‍वारंटाइन बेड, ७ पोझिशन आयसोलेशन बेड, व्‍हायरसगार्ड पार्टिशन, ट्रॅव्‍हलगार्ड पार्टिशन आणि हँड वॉश स्‍टेशन्‍स यांचा समावेश आहे. ब्रॅण्‍डने क्विक कोविड बेड देखील सादर केले आहे. हे उत्‍पादन सर्वात किफायतशीर असून हे असेम्‍बल व इन्‍स्‍टॉल करण्‍यासाठी ३ मिनिटांहून कमी वेळ लागत असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.  
या नाविन्‍यपूर्ण उत्‍पादनांबाबत नीलकमल लिमिटेडच्‍या कार्यसंचालनांचे उपाध्‍यक्ष अजय अग्रवाल म्‍हणाले, ‘कंपनी म्‍हणून नीलकमलने सुविधा उभारत या आवश्‍यकतांची पूर्तता करण्‍याचे काम हाती घेतले आहे. ही नाविन्‍यपूर्ण उत्‍पादने अद्वितीय सोल्‍यूशन्‍स निर्माण करण्‍यासाठी अहोरात्र काम करत आलेल्‍या आमच्‍या संशोधन व विकास टीमच्‍या मेहनतीचे फळ आहेत. आम्‍हाला आशा आहे की, हे सोल्‍यूशन्‍स या म‍हामारीविरोधातील लढ्यामध्‍ये सर्व भागधारकांना लाभदायी ठरतील.
क्वारंटाईन रुग्णालयासाठी ‘नीलकमल’चा पुढाकार

‘नीलकमल ७ पोझिशन आयसोलेशन बेड हा एक अँग्‍युलर बेड आहे, जो रूग्‍णांना सुलभपणे श्‍वासोच्‍छ्वास मिळण्‍याची खात्री देतो. यामध्‍ये एक ऑक्सिजन सिलिंडर व सलाइन हूकसह एक यंत्रणा आहे. या यंत्रणेअंतर्गत ६५ अंशापर्यंत अवलंबून राहू शकते. यामध्‍ये वरील बाजूस वेन्टिलेशन असून हवानिर्मित संसर्ग कमी करण्‍यासाठी ३६०-अंश संरक्षणात्‍मक पारदर्शक कव्‍हरिंग असते. तसेच यामध्‍ये पावडर-कोटेड मेटल फ्रेम आणि नॉकडाऊन असेम्‍ब्‍ली वैशिष्‍ट्य आहे.
उच्‍च क्षमतेच्‍या प्‍लास्टिक शीट्सपासून बनवण्‍यात आलेले नीलकमलचे क्विड कोविड बेड दीर्घकाळापर्यंत टिकतो आणि अत्‍यंत किफायतशीर आहे. हा बेड ३ मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्‍ये असेम्‍बल करता येऊ शकतो. हा बेड निर्जंतुकांसह सुलभपणे स्‍वच्‍छ व सॅनिटाईज करता येतो आणि १०० टक्‍के वॉटरप्रूफ असून पुन्हा वापरता येतो. हा बेड वजनाने हलका असल्‍यामुळे सहजपणे वाहून नेता येतो आणि या बेडची ३०० किग्रॅपर्यंतचे वजन वाहून नेण्‍याची उच्‍च क्षमता आहे. तसेच या बेडला वाळवी लागत नाही आणि जीवाणूमुक्‍त असण्‍यासोबत कार्डबोर्ड बेड्सप्रमाणे या बेडमधून दुर्गंधी येत नाही.

व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here