क्वारंटाईन रुग्णालयासाठी ‘नीलकमल’चा पुढाकार

मुंबई :
प्रसिध्द फर्निचर ब्रँड नीलकमलने १००० कोव्हिड क्वारंटाइन बेड्स, बिछाने आणि इतर फर्निचरचा पुरवठा करत एक तात्पुरते हॉस्पिटल उभारण्याच्या कामी मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटीसोबत (एमएमआरडीए) हातमिळवणी केली आहे. ही भारतातील अशाप्रकारची पहिलीच सुविधा असून २ आठवड्यांच्या विक्रमी वेळेत तिची उभारणी करण्यात आली आहे. रुग्णांचे येथील वास्तव्य आरामदायी व सोयीचे ठरावे याचा विचार करून येथील बेड्ससह इतर सोयीसुविधांचा विकास करण्यात आला आहे.
नीलकमलच्या कोव्हिड क्वारंटाइन बेडचे नाविन्यपूर्ण स्टॅकेबल असून, हे बेड्स वापरायला सोपे, साठवणुकीसाठी तसेच ने-आणीसाठी सोयीचे आहेत. या बेडला एक बहुउपयोगी कॅबिनेट जोडलेले आहे, ज्याचा वापर वस्तू ठेवण्यासाठी, जेवण्यासाठी व इतर वेळी बेडसाइट टेबल म्हणून होऊ शकेल.
ब्ल्यू डार्टने सुरु केली ‘कॉण्टॅक्टलेस’ सेवा

या उपक्रमाबद्दल बोलताना नीलकमल लिमिटेडच्या ऑपरेशन्स विभागाचे व्हीपी अजय अग्रवाल म्हणाले, ‘हे तात्पुरते हॉस्पिटल उभारण्याच्या कामी दाखविलेल्या तत्परतेबद्दल आम्ही मुंबईकरांच्यावतीने एमएमआरडीचे आभार मानतो. एमएमआरडीच्या ऑपरेशन्स कमिटीची चपळतेने निर्णय घेण्याची क्षमता, विचारांची स्पष्टता, दर्जेदारपणाबाबतचे काटेकोर धोरण आणि दिलेले काम नियोजित वेळेत पूर्ण करून घेण्याची शिस्त हे सर्व गुणविशेष या कामाच्या निमित्ताने दिसून आले. हा प्रकल्प विक्रमी वेळेत कार्यान्वयीत करण्यात आला व हे करत असताना बारीकसारीक तपशीलांकडेही बारकाईने लक्ष दिले गेले. आमच्या क्षमतांवर विश्वास ठेवून या कामामध्ये आपला वाटा उचलण्यासाठीची संधी आम्हाला दिल्याबद्दल आम्ही एमएमआरडीएचे आभारी आहोत. असंख्य अडचणी आणि मर्यादा भेडसावत असूनही या प्रकल्पासाठी आपली उत्पादने यशस्वीरित्या आणि नियोजित वेळेच्या आधीच पोहोचती करणा-या आमच्या टीमचा आम्हाला अभिमान आहे. कोविड-१९ विरोधातील या लढाईमध्ये आम्ही महाराष्ट्र सरकार, एमएमआरडीए आणि सर्व यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहोत.”
नीलकमलचे क्वारंटाइन आणि आयसोलेशन बेड्स झारखंड, सोलापूर, प. बंगाल, तमिळनाडू आणि ठाणे अशा देशभरातील विविध ठिकाणच्या हॉस्पिटल्समध्ये यापूर्वीच वापरात आणले गेले आहेत. याशिवाय विविध ठिकाणी हे बेड्स लावण्याचे काम सुरू आहे.

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here