‘न्यूबर्ग’ समूह उपाध्यक्षपदी ए. गणेशन

Neuberg Diagnostics

मुंबई :
न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्सतर्फे (Neuberg Diagnostics) ए. गणेशन यांची न्यूबर्ग डायग्नॉस्टिक्सच्या समूह उपाध्यपदी नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. या नव्या भूमिकेत गणेशन यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी असेल आणि व्यवसाय विस्तारीकरणामध्ये ते सक्रिय सहभागी असतील. 
गणेशन चार्टर्ड अकाउंटंट असून त्यांना अॅश्युअरन्स आणि अॅडव्हायजरी क्षेत्राचा ३३ वर्षांचा अनुभव आहे आणि आरोग्यसेवा क्षेत्रात ते दिग्गज आहेत आणि यापूर्वी त्यांनी मेट्रोपोलिस समूह, ट्रायव्हिट्रॉन समूह आणि मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल्स यांच्यासाठी विलीनीकरण आणि अधिग्रहण व्यवहार हाताळले होते. न्यूबर्गमध्ये ते वित्त विभागाचे संचालक होते. या पदावर कार्यरत असताना त्यांची व्यापक दृष्टी आणि सक्रिय प्रयत्नांमुळे कंपनीला अनेक सन्मान प्राप्त झाले आणि ही कंपनी देशातील चौथ्या क्रमांकाची डायग्नॉस्टिक कंपनी झाली.
यावेळी ए गणेशन म्हणाले, “सध्या विस्तारीकरणाच्या टप्प्यावर असलेल्या आमच्या कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी मिळणे हा माझा बहुमान समजतो. सध्याच्या प्रगतीपथावर हा प्रवास असाच सुरू राहील याची खातरजमा करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहीन. सध्याच्या मान्यवर नेतृत्वासोबत काम करण्यास मी अत्यंत उत्सुक आहे.”
गणेशन हे मद्रास विद्यापीठाचे रसायनशास्त्र विषयाचे पदवीधर आहे आणि द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) या संस्थेचे फेलो मेंबर आहेत. ते सध्या ट्रायव्हिट्रॉन हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड, कावेरी हॉस्पिटल आणि मॅक्सिव्हिजन आय हॉस्पिटल्स प्रा. लि.च्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. ते मेट्रोपोलिस हेल्थकेअर लि.चे संचालकही होते. २०१५ साली त्यांनी हा पदभार सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here